महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय आणि मराठी विज्ञान परिषद,उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी जैवशास्त्रावर आधारित पोस्टर आणि मॉडेलच्या सादरीकरणाची स्पर्धा घेण्यात आली, यासाठी एकूण 30 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के.मस्के हे होते, प्रमुख पाहुणे म्हणून मराठी विज्ञान परिषद, उदगीरचे अध्यक्ष तथा श्री हावगी स्वामी महाविद्यालय उदगीरप्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.एस.एन.शिंदे हे होते. आपल्या व्याख्यानात बोलताना शिंदे म्हणाले की विज्ञान विषयाचे ज्ञान हे मातृभाषेतून व्हावे जेणेकरून विज्ञानातील संकल्पना विद्यार्थ्यांना समजण्यासाठी सोप्या जातील ज्यामुळे मूलभूत संशोधनाकडे विद्यार्थ्यांचा ओढा निर्माण होईल. याप्रसंगी ज्योती गादगे यांचा मराठी विज्ञान परिषद तथा महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय यांच्यातर्फे आयोजित विभागीय स्तरावर निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांक आल्याबद्दल सत्कार करण्यात आला. पोस्टर स्पर्धेच्या तीस स्पर्धकातून प्रथम क्रमांक शेख जुबेरिया आणि स्वामी विद्या, द्वितीय क्रमांक पंचभाई हुजा आणि निरने ऋतुजा, तृतीय क्रमांक शुभम कटके आणि लोणीकर नव्यानवेली यांनी पटकावला उत्तेजनार्थ म्हणून प्रीती जाधव, हवालदार अल्फिया, प्रणाली कांबळे यांची निवड करण्यात आली आले. यासाठी प्रथम बक्षीस पाचशे, द्वितीय बक्षीस तीनशे रुपये आणि तृतीय बक्षीस दोनशे असे ठेवण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.आर.बी.अलापुरे यांनी तर पोस्टर प्रदर्शनाचे परीक्षणाचे काम प्रा.डॉ.एम.बी.मानकरी यांनी केले. अध्यक्ष समारोपात प्राचार्य मस्के म्हणाले की, विज्ञानाच्या विद्यार्थ्यांनी विविध भाषा आत्मसात करून त्याच्या आधारे स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.प्रीती जाधव या विद्यार्थिनीने तर आभार कु.कांबळे प्रणाली या विद्यार्थिनीने मांडले. याप्रसंगी प्रा.डॉ.एस.जी.पाटील, प्रा.डॉ.जे.एम.पटवारी, प्रा.डॉ.बी.एम.संदिकर, प्रा.डॉ.पी.एस.नागपूर्णे,प्रा.डॉ.बी.एस. कांबळे, प्रा.डॉ.एस.बी.शेटे प्रा.अश्विनी भाताडे, प्रा.जी.एस.पाटील हे उपस्थित होते.