एकंबेकर महाविद्यालयात राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालयात भारतीय सामाजिक विज्ञान अणुसंधान परिषद, मुंबई यांच्या सौजन्याने आणि अर्थशास्त्र विभागाच्या वतीने दिनांक 2 मार्च 2024 शनिवार रोजी “आजादी का अमृत काल:उपलब्धी,संधी आणि आव्हाने” या विषयावर एक दिवशीय बहुविद्या शाखीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.या परिषदेसाठी महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. संजयजी बनसोडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या परिषदेचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे अंतरविद्याशाखाचे अधिष्ठाता डॉ.बाविस्कर सी. आर यांच्या हस्ते होणार आहे. या परिषदेसाठी प्रमुख वक्ते म्हणून पीपल्स कॉलेज नांदेड येथील डॉ.व्ही. व्ही. सुकाळे यांचे मार्गदर्शन होणार आहे. त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी म्हणून सी.सी.शेठ कॉमर्स कॉलेज, अहमदाबाद ( गुजरात) येथील डॉ. जगतराव धनगर यांची उपस्थिती राहणार आहे. या परिषदेसाठी प्राध्यापक, संशोधक विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमप्रकाश क्षिरसागर तसेच अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. मदन शेळके यांनी केले आहे.