कै. रसिका महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन
देवणी (प्रतिनिधी) : कै. रसिका महाविद्यालय, देवणी येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत जावळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य डॉ शिवाजी सोनटक्के यांच्या सह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. या स्नेहसंमेलनामध्ये आनंदनगरी मध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. तसेच प्रकाश भालके, अनिल कोनाळे, परमेश्वर रणदिवे, साहिल चिद्रेवार, दिव्या तादलापुरे, अंजली स्वामी, पृथ्वीराज कदम, बुद्धीराज शिंगे, हरिओम लांडगे या विद्यार्थ्यांनी आजच्या राजकीय परिस्थितीवर मार्मिक भाष्य करणारे ‘राजाची कमाल प्रधानाची धमाल’ हे विडंबनात्मक नाटक सादर केले. तसेच जागतिकीकरणाच्या काळात सामान्य माणसाची कशी फसवणूक होते व या फसवणुकीपासून सावधान राहण्यासाठी नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी यावर आधारित ‘जागो ग्राहक जागो’ हे मार्मिक नाटक सादर केले. विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम अंतर्गत मराठी, हिंदी काव्यवाचन, वैयक्तिक व समूह नृत्य इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. हे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न होण्यासाठी प्रा. डॉ. सुदर्शन पेडगे, प्रा. डॉ. गोपाल सोमानी, प्रा. डॉ.महादेव टेंकाळे, प्रा.डॉ. सुलोचना डेंगाळे, प्रा. डॉ. अंकुश भास्कर, प्रा. धनराज बिराजदार यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.