कर्तव्यदक्ष सहायक गटविकास अधिकारी – वैजनाथराव सोपानराव कांबळे
देवणी (लक्ष्मण रणदिवे) : नौकरी म्हटले की पदोन्नती ,सेवानिवृती या आयुष्याच्या घटनाक्रमातून प्रत्येक कर्मचाऱ्यांना जावे लागते. अशी ३४ वर्षांची प्रदीर्घ सेवा करून ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी ते सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून श्री वैजनाथ सोपानराव कांबळे हे २९ फेब्रुवारी२०२४ रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या केलेल्या कार्याचा थोडक्यात आढावा पुढील प्रमाणे आहे.
वैजनाथ कांबळे यांचा जन्म उदगीर तालुक्यातील हेर या गावी सर्वसामान्य गरीब कुटूंबात झाला. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असतांना सुद्धा शिक्षणाशिवाय मनुष्याच्या जीवनात प्रगती नाही, अतिशय कठीण परिस्थितीत शिक्षण घेऊन नोकरीसाठी प्रयत्न केले. वैजनाथ कांबळे यांच्या प्रयत्नाला यश आले. दि २२ ऑक्टोबर १९९० रोजी ठाणे जिल्ह्यात ग्रामसेवक पदावर जिल्हा परिषद कार्यालयात ते रुजू झाले. त्यांनी ठाणे जिल्ह्यातील ऐरोली ग्रामपंचायत कार्यलयात चार वर्षे चांगल्या प्रकारे सेवा बजावली. यांच्या कार्याची दखल घेऊन सन १९९४ मध्ये लातूर जिल्हा परिषदेत बदली झाली व उदगीर पंचायत समितीत मध्ये रुजू झाले. तेव्हा उदगीर, वाढवाणा,हाळी हंडरगुळी, निडेबन, जळकोट आणि किणी याल्लादेवी व उदगीर तालुक्यातील ४ ते ५ गावे हागणदारी मुक्त करण्यात आले. या सर्वाधिक मोठ्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून या सर्वाधिक मोठ्या ग्रामपंचायतिच्या माध्यमातून विविध योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम केले. या कार्याची दखल घेऊन २००८ते मे २०१३ पंचायत समिती शिरुर अनंतपाळ येथे रुजु झाले. डिगोळ,साकोळ, येरोळ येथे मुख्य कार्यकारी अधिकारी गेडाम व उपसंचालक पटवारी यांच्या सूचनेनुसार डिगोळ गाव दोन महिन्यामध्ये हागणदारी मुक्त करण्यात आले. २४.७.२०१३ रोजी चाकूर पंचायत समितीला त्यांची ग्राम विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती झाली. तेथे आय. आर. डि. पी. या पदावर कार्यरत राहिले. २०१८ ते ९.९.२०२१ते आजतागायत देवणी पंचायत समितीत सहाय्यक गटविकास अधिकारी या पदावर कार्यरत होते. वैजनाथ कांबळे यांना१९९७ साली आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कोरोना काळात बचत गटाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयेची मदत केली आहे, तर वृक्ष लागवड , विशेष कर वसुली, रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास, शबरी आवास योजनेअंतर्गत लोकांना घरकुलाचा लाभ मिळवून देण्याचे काम कांबळे यांनी केले आहे. तसेच स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत घर तिथे शौचालय मंजूर करून ते पूर्ण करून घेण्याचे काम करून घेतले आहे. पंचायत समिती अंतर्गत होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडल्या आहेत, जिल्हा परिषद शाळेचा शैक्षणिक दर्जा वाढावा, म्हणुन वेळोवेळी शाळेला भेटी देऊन त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम वैजनाथ कांबळे यांनी केले आहे. तर पंचायत समितीला येणाऱ्या शेष फांडातून विविध प्रकारच्या योजनेमार्फत शिवण यंत्र, पिठाची गिरणी, दिव्यंगासाठी साहित्याचे वाटप कांबळे यांनी केले आहे. कांबळे यांना वेळोवेळी वरिष्ठ अधिकारी श्याम पटवारी यांचे मार्गदर्शन मिळाले, त्यामुळे हे शक्य झाले हे सर्व कार्य नेत्रदीपक केल्यामुळे प्रशासनाने यांना पाच वेळा आगाऊ वेतनवाढ दिली आहे. ते २९ फेब्रुवारी २०२४ रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचे पुढील आयुष्य सुखी समाधानी जावे हीच शुभेच्छा.