बेनिनाथ शेतकरी उत्पादक कंपनीकडून श्यामभाऊ सोनटक्के यांचा सत्कार
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुक्यातील मौजे लोहारा येथील बेनीनाथ शेतकरी उत्पादक कंपनीकडून शाम भाऊ सोनटक्के यांचा हृदय सत्कार करण्यात आला.बेनीनाथ शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करणे या उद्देशाने भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या शेतकरी मेळाव्यात राज्य सरकारकडून कृषिभूषण (सेंद्रिय शेतीनिष्ठ)पुरस्कार 2021चा जाहीर झाल्याबद्दल कृषि विभाग उदगीरच्या वतीने संजय नाबदे तालुका कृषी अधिकार उदगीर यांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. व बेनिनाथ शेतकरी उत्पादक कंम्पनी लोहाराच्या वतीने संचालक पद्माकर मोगले यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राजेंद्र इंगळे विभागीय संचालक अफॉर्म लातूर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सचिन पुणेकर संचालक उद्योजक विकास अफॉर्म पुणे, राजेश मुळजे मंडळ कृषी अधिकारी वाढवणा, सुनील चव्हाण कृषी प्रय॔वेक्षक उदगीर, मोहनराव पाटील प्रगतशील शेतकरी, ग्रामपंचायत सदस्य लोहारा, हंसराज मोमले अध्यक्ष बेनीनाथ शेतकरी उत्पादक कंपनी लोहारा व त्यांचे सर्व संचालक, शेतकरी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शामभाऊ सोनटक्के यांनी लोहारा येथे गोरक्षणाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीचा यशस्वी प्रयोग करून परिसरातील शेतकऱ्यांनाही प्रेरणा दिली आहे. त्यांच्या या प्रेरणादायी कार्याचा गौरव महाराष्ट्र शासनाने केला असून त्यांना सेंद्रिय शेतीनिष्ठ कृषी भूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांचा हा सन्मान म्हणजे उदगीर तालुक्यातील समस्त शेतकऱ्यांचा सन्मान समजून बेनीनाथ शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.