लाल बहादुर शास्त्री विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील लाल बहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालय उदगीर येथे संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान,महाराष्ट्र- गोवा यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या संस्कृतीज्ञान परीक्षेत तीन विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल प्राप्त केले.इयत्ता 7वी तून सर्वप्रथम रोहित विष्णू पाटील, इयत्ता 6वी तून सर्वप्रथम व्यंकटेश प्रमोद केंद्रे, इयत्ता 5वी तून सर्वप्रथम वेदांत नवनाथ मोरखंडे यांनी बक्षीस प्राप्त केले आहे. शाळाबाह्य परीक्षा प्रमुख तथा लाल बहादुर शास्त्री विद्यालयातील या परीक्षेचा प्रमुख म्हणून साहित्यिक निता मोरे यांचाही सन्मान करण्यात आला. तहसीलदार राम बोरगावकर, अमोल निदवदे, डॉ. अंबादास शेकापूरकर, संतोष कुलकर्णी, सरदार वल्लभभाई पटेल विद्यालयाच्या मुख्याध्यपिका मंजुषा कुलकर्णी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
नैतिक शिक्षण योजनेअंतर्गत, नैतिक शिक्षणाचा प्रचार व प्रसार केला जातो. परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जीवनमूल्य रुजवण्याचा प्रयत्न होतो. इयत्ता पाचवी साठी संतकथा, सहावी साठी चरित्र रामायण, सातवीसाठी कथारूप महाभारत व आठवीसाठी क्रांतिगाथा या कथा पुस्तकांवर आधारित परीक्षा घेण्यात आली.
याप्रसंगी स्थानिक समन्वय समितीचे कार्यवाह शंकरराव लासुने, मुख्याध्यापक अंबादास गायकवाड, उपमुख्याध्यापक संजय कुलकर्णी, पर्यवेक्षक लालासाहेब गुळभिले, कृष्णा मारावार, माधव मठवाले यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.