आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रयत्नांना यश; मुरुड रेल्वे स्थानकावर दोन रेल्वे गाड्यांना थांबा
लातूर (एल.पी.उगीले) : लातूर तालुक्यातील मुरुड येथील रेल्वे स्थानकावर भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रयत्नामुळे परळी मिरज आणि निजामबाद पंढरपूर या दोन रेल्वे गाड्यांना जाताना आणि येताना थांबा देण्यात आला आहे. कोरोना काळापासून मुरुड रेल्वे स्थानकावर एकही रेल्वे थांबत नव्हती. सदरील दोन रेल्वे गाड्यांना थांबा मिळाल्याने मुरुड आणि परिसरातील भाजपाच्या लोकप्रतिनिधी पदाधिकाऱ्यांसह नागरिकांच्या वतीने आ कराड यांचे आभार व्यक्त केले आहेत. लातूर तालुक्यात सर्वाधिक लोकसंख्येने मोठे गाव असलेल्या आणि आजूबाजूच्या 15-20 गावची बाजारपेठ असलेल्या मुरुड गावानजीक रेल्वेचे स्थानक उभारण्यात आले आहे. लातूर – मुंबई, परळी – मिरज, पंढरपूर – निजामाबाद, बिदर – मुंबई या गाड्यांना जाताना आणि येताना मुरुड रेल्वे स्थानकावर थांबा होता, मात्र कोरोनाच्या काळापासून या सर्व रेल्वे गाड्यांचा थांबा रद्द करण्यात आल्याने आणि परिसरातील व्यापाऱ्यासह जनतेची मोठी गैरसोय निर्माण झाली होती.
मुरुड रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या रेल्वेंना पूर्ववत थांबा मिळावा, यासाठी मुरुड आणि परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार भाजपाचे नेते आ. रमेश आप्पा कराड यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील त्याचबरोबर संबंधित रेल्वे अधिकाऱ्याकडे लेखी मागणी करून सातत्याने पाठपुरावा केला होता. आ रमेशआप्पा कराड यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे रेल्वे मंत्रालयाच्या वतीने 1 मार्च 2024 रोजीच्या परिपत्रकानुसार मुरुड रेल्वे स्थानकावर परळी – मिरज आणि निजामबाद – पंढरपूर या दोन्ही रेल्वे गाड्यांना जाताना आणि येताना थांबा देण्याचे आदेशित केले आहे.
रेणापूर तालुक्यातील पानगाव आणि कारेपूर येथील रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या रेल्वे गाड्याचा रद्द झालेला थांबा लवकरच पूर्ववत थांबा देण्यात येणार असल्याचे सांगून लातूर मुंबई या रेल्वे गाडीला मुरुड स्थानकावर लवकरच थांबा मिळणार आहे. याबाबतची रेल्वे मंत्रालय प्रक्रिया पूर्ण करीत असल्याची माहिती भाजपा नेते आ रमेशआप्पा कराड यांनी दिली.
मुरुड रेल्वे स्थानकावर दोन रेल्वे गाड्यांना थांबा मिळवून दिल्याबद्दल भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांचे मुरुड येथील सरपंच श्रीमती अमृता अमर नाडे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष हनुमंतबापू नागटिळक, भाजपाचे तालुकाध्यक्ष बन्सी भिसे,तसेच सतत प्रयत्नशील संतोष राऊत , सुरज शिंदे, आनंत कणसे, रवी माकोडे, महेश कणसे, डॉ हणुमानदास चांडक,वैजनाथ हराळे नागराज बचाटे लताताई भोसले, अविनाश सवई, श्याम वाघमारे, भैरवनाथ पिसाळ, लहू सव्वाशे, शाम करपे, विशाल कणसे, रवी आबा नाडे, श्रीकांत नाडे, सुर्यकांत गाडे, सचिन घोडके, संतोष काळे, तात्या ईटकर, प्रवीण पाटील, सूरज सूर्यवंशी, श्रुती सवई,बालाजी पटाडे, आसरूबा चव्हाण, आंजू शिंदे यांच्यासह अनेकांनी आभार व्यक्त केले आहेत.