दापका शाळेत पोस्को कायदा जनजागृती कार्यक्रम
कमालनगर (एल.पी.उगीले) : सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळा चवरदापका येथे पोक्सो कायद्याची माहितीपर कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय बिदर यांच्या तर्फे करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक भानुदास वासरे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून बिदर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक रेवती मॅडम, राठोड मॅडम व माध्यमिक शाळेचे सहशिक्षक संजीव बिरादार होते.राठोड मॅडम यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.पोक्सो कायद्याबद्दलची माहिती देऊन ,छेडछाडीच्या प्रकाराला कसा आळा घालावा? तसेच मुलीनी काय दक्षता घेतली पाहिजे? याबद्दलची माहिती सांगितले.रेवती मॅडमनी बालविवाहाचे तोटे सांगून बालविवाह कसे टाळले पाहिजे, याबद्दलची माहिती सांगितली.मुलींनी शिक्षणाकडे लक्ष देऊन विविध क्षेत्रात प्रगती करावी व प्रेमाच्या भानगडीत न पडता एकाग्रतेने शिक्षण घ्यावे असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश सावळे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहशिक्षक पांढरी भोसले, स्वामी, गुणवंत,सौ अर्चना शिंदे,सौ राजश्री कदम ,सौ सुवर्णा खंदाडे ,सौ अर्चना सुरशेटवार,सौ अज्ञान, सौ मीरा यांनी सहकार्य केले.