शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांच्या अध्यक्षतेखाली लातूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न!!

0
शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांच्या अध्यक्षतेखाली लातूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न!!

शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांच्या अध्यक्षतेखाली लातूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न!!

लातूर (प्रतिनिधी) : शासकीय विश्रामगृह लातूर येथे लातूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मार्गदर्शन करत असताना शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने साहेब असे म्हणाले की शिवसेनेची संघटनात्मक बांधणी करून व सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून लातूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा गड मजबूत करणे गरजेचे आहे. तसेच शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा सन्माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांनी घेतलेले स्तुत्य निर्णय सर्वसामान्य माणसाच्या हिताचे असून हे सर्व निर्णय तसेच इतर शासकीय योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर अवलंबून आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून निर्णय घेतात ते सर्व निर्णय सर्व सामान्य माणसाच्या कुटुंबा पर्यंत पोहोचवण्यासाठी गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक असणे अत्यंत गरजेचे आहे. येत्या कालावधीमध्ये लवकरात लवकर प्रत्येक गावात शिवसेनेची शाखा झालीच पाहिजे. शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची शिदोरी 80% समाजसेवा 20% राजकारण हा कानमंत्र घेऊन सर्व पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे असे आवाहन जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने साहेब यांनी केले. महिला आघाडी युवा सेना ,युवती सेना, अंगीकृत संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या संघटनेची बांधणी व्यवस्थित करून लातूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेची घोडदौड वेगाने झाली पाहिजे. कुठल्याही प्रसंगी मी जिल्हाप्रमुख या नात्याने तुमच्यासोबत आहे. शिवसेनेची बांधणी करून जास्तीत जास्त प्रमाणात सदस्य नोंदणी, प्रत्येक गावात शिवदूताची नेमणूक करून शिवसेनेची ताकद वाढवावी असेही शिवाजीराव माने म्हणाले .या बैठकीसाठी महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख कल्पनाताई बावगे, युवा सेना जिल्हाप्रमुख कुलदीप सूर्यवंशी, युवती सेना जिल्हाप्रमुख ॲड. राधिका पाटील, उप जिल्हाप्रमुख सतीश देशमुख , विष्णू साबदे, महानगर प्रमुख सिद्धेश्वर कदम, लातूर तालुका प्रमुख सदाशिव गव्हाणे, विकास शिंदे, गणेश माडजे, औसा शहर प्रमुख बंडू कोदरे, महिला तालुकाप्रमुख शोभा कदम, महिला तालुकाप्रमुख निलंगा सविताताई पांढरे, शिवसेना शहर प्रमुख दिनेश बोरा, ॲड. परवेज पठाण, महिला शहर प्रमुख मीनाक्षी मुंदडा, बबीता गायकवाड, युवा सेना तालुकाप्रमुख बाळासाहेब दंडीमे, शहर संघटक संदीप मामा जाधव, युवराज वंजारे, आबा उपाडे, विजय कांबळे उपशहर प्रमुख, मागासवर्गीय सेल मुन्ना कांबळे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष रोहित जाधव, वाहतूक सेना जिल्हा उपाध्यक्ष गुणवंत सूर्यवंशी, रोहित रोंगे, शिवाजी पांढरे, सुदर्शन शिंदे, संतोष पाटील शहर संघटक, शहर प्रमुख शिरूर अनंतपाळ विनोद धुमाळे ,सचिन पवार, दत्ता लोभे, दगडू कांबळे, लक्ष्मीताई काकणे, लक्ष्मण कुंभार असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *