ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता व कौशल्य आहे – प्रा अनिल चवळे
किनगाव (गोविंद काळे) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता व कौशल्य आहे फक्त त्या गुणवत्तेला योग्य दिशा देण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे असे प्रतिपादन अहमदपूर तालुक्यातील कोपदेव हिप्परगा येथील जिल्हा परिषद प्रशाले मध्ये विद्यार्थ्यांचा विविध कला व गुणदर्शन व मराठी राजभाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना कवी प्रा. अनिल चवळे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक गोपीनाथ लहाने सर हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये कोपदेव हिप्परगा विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन नारायणराव आगलावे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्राध्यापक अनिल चवळे यांनी आपण मराठी भाषा बोलतो हे आपले भाग्य आहे कारण मराठी भाषा ही सर्व भाषांना सामावून घेऊन चालणारी भाषा आहे व जगातील प्राचीन भाषेपैकी एक आहे. असे ते यावेळी म्हणाले. मराठी भाषा आहे प्रत्येक बारा कोसावर बोली बदलत जाते . मराठी भाषा ही समृद्ध व परिपूर्ण भाषा आहे . आपण कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो असे त्यांनी यावेळी सांगितले. विद्यार्थ्यांपुढे त्यांनी आपल्या सुंदर अशा कविता सादर करताना ” गावाकडची शाळा” ही कविता सादर केली. यावेळेस त्यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये जिद्द चिकाटी व संघर्ष करण्याची तयारी असते फक्त आपण सर्वांनी मिळून या त्यांच्या कौशल्याला दिशा देण्याचे कार्य केले पाहिजे यामुळेच या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमात प्रशालेतील विद्यार्थ्यांनी कथा, कविता सादरीकरणा बरोबरच, कलेचे विविध प्रकार सादर केले यामध्ये भारुड, पोवाडे व नृत्य आधी सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तानाजी पुट्टेवाड सर यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद डाके सर यांनी केले तर आभार सुधाकर केंद्र सर यांनी व्यक्त केले यावेळी विद्यालयातील श्रीमती स्वाती क्षिरसागर मॅडम, सुरेश अंदुरे सर व गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.