सौरभ वाडीकर यांचा सत्कार
सौरभ वाडीकर यांचा सत्कार
अहमदपूर (गोविंद काळे) : शहरातील तळेगाव रोड येथील गिताई नगर येथे सौरभ शिवाजी वाडीकर यांचा २५ फेब्रुवारी रोजी सत्कार करण्यात आला.सौरभ शिवाजी वाडीकर यांची महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात सहाय्यक स्थापत्य अभियंता पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी माधवराव जाधव, मारोती मिरजगावे, रमेश बिराजदार, बस्वराज टाळकुटे, हरी पुंडे,वैजनाथ मिरजगावे,तुकाराम नरहारे आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सुत्रसंचालन गणपतराव जाधव यांनी तर आभार नरसिंग सांगवीकर यांनी मानले.
