भटक्या विमुक्त जाती व जमाती प्रवर्गातील नागरिकांना दाखल्यांचे वाटप शासनाच्या विविध योजनेची जनजागृती
अहमदपूर (गोविंद काळे) : जिल्हाधिकारी लातूर व तहसील कार्यालय अहमदपूर याच्या संयुक्त विद्यमाने भटक्या विमुक्त जाती जमातीतील वंचित लाभार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले व मतदार नोंदणी कार्यक्रम सांगवीताडा ता.अहमदपूर येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत १ मार्च रोजी पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थी तहसीलदार शिवाजीराव पालेपाड तर व्यासपीठावर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोलकुमार आंदेलवाड, नायब तहसीलदार मुनवर मुंजावर, अक्षय म्हेत्रे,रश्मिता साहू, तालुका आरोग्य अधिकारी एस.पी.बस्तापूरे,मुख्याध्यापिका महानंदा गोरगे,विनोद गुंठे आदींची प्रमुख उपस्थिती होती.तहसील कार्यालयात मिळणारे रेशन कार्ड , मतदान ओळखपत्र, जाॅबकार्ड, संगांयोजनेचे लाभार्थी,उत्पन्नाचे प्रमाण पत्र, आयुष्यमान भारत कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र आदीचे यावेळी वितरण करण्यात आले.त्यानंतर विविध योजनेचे स्टाल लावून प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.आरोग्य तपासणी शिबीराच्या माध्यमातून नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.या प्रसंगी तहसीलदार शिवाजीराव पालेपाड, गटविकास अधिकारी अमोलकुमार आंदेलवाड, अक्षय म्हेत्रे, भाग्यश्री जिलेवाड, एस.पी.बस्तापुरे, अशोक सोळंके, मंगेश जाधव आदीनी मनोगतावर भाषणे करत त्यांच्या विभागाच्या विविध शासकीय योजना उपस्थित नागरिकांना सांगून लाभ घेण्याचे आवाहन केले.तहसीलदार शिवाजीराव पालेपाड यांनी अध्यक्षीय समारोप भाषणात शासन आपल्या दारी हे अभियान राबविण्यात येत असुन त्याचाच एक भाग म्हणून उपेक्षित वंचितांना न्याय मिळावा या लोकोपयोगी भावनेतून जिल्हाधिकारी वर्षा घुगे-ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबविण्यात आला असून अहमदपूर तहसील कार्यालयात या योजना सदैव व निरंतर चालू आहेत. नागरिकांच्या सेवेसाठी मी व माझे सहकारी सदैव कटीबद्ध आहोत असे बोलताना त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तलाठी महेश गुपिले यांनी, सूत्रसंचालन नरसिंग सांगवीकर यांनी तर आभार तलाठी प्रशांत बिराजदार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळ अधिकारी नागनाथ कवठे, सुनिता ताटीपामूलवार, अव्वल कारकून हणुमंत जक्कलवार, दत्तात्रय निलावार,एल.एस.केंद्रे,तलाठी अमोल कासले,समीर पठाण, शिवराज कांबळे, महसूल सहाय्यक संभाजी सुडे, ग्रामसेवक आर.डी. कांबळे, कोतवाल शिवानंद व्हटमुर्गे,संदीप पौळ, शिपाई आकाश कंधारकर यासह प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परीश्रम घेतले.