संत ज्ञानेश्वर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस विविध उपक्रमाने साजरा
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन घेऊन व विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापक आशा रोडगे तर उद्घाटक म्हणून संस्थेच्या उपाध्यक्षा अँड.मानसी ताई हाके पाटील प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक मीना तोवर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचा शुभारंभ शास्त्रज्ञ सी.व्ही.रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक युवराज मोरे व वैष्णवी शिंगडे यांनी मार्गदर्शन केले. विज्ञान प्रदर्शनाचे निरीक्षण मीना तोवर व युवराज मोरे यांनी केले. यात सर्व प्रथम नोमान शेख , अल्तमश शेख, द्वितीय वेदांत कलवले, तृतीय -आर्यन आरदवाड , स्वराज मोरे यांच्या प्रयोगाची निवड करून त्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांची विज्ञानावर आधारित प्रश्नमंजुषा ही घेण्यात आली. प्रास्ताविक अश्विनी घोगरे यांनी सूत्रसंचालन सतीश साबणे यांनी तर आभार मंगेश शिवनखेडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचा समारोप विज्ञान गीताने करण्यात आला.