मराठी भाषेत व्याकरण नव्हे तर भावनेचे अंत:करण महत्वाचे – प्राचार्य डॉ. वसंत बिरादार

0
मराठी भाषेत व्याकरण नव्हे तर भावनेचे अंत:करण महत्वाचे - प्राचार्य डॉ. वसंत बिरादार

मराठी भाषेत व्याकरण नव्हे तर भावनेचे अंत:करण महत्वाचे - प्राचार्य डॉ. वसंत बिरादार

अहमदपूर (गोविंद काळे) : मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे. तिच्यातील व्याकरणापेक्षा भावनेचे अंत:करण तोलामालाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक व ललित लेखक प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केले. ते येथील महात्मा फुले महाविद्यालयातील मराठी राजभाषा दिनानिमित्त बोलत होते. यावेळी पुढे ते म्हणाले की, मराठी भाषेचा इतिहास अतिप्राचीन असून या भाषेमध्ये जवळपास पंचावन्न वाड.मय प्रकार आहेत . तसेच महाराष्ट्र व गोवा राज्याची राजभाषा म्हणून मराठीत मान्यता आहे . परंतु, केंद्र सरकारच्या उदासीनतेमुळे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाही. याकरिता प्रत्येक मराठी भाषिकाने मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ . वसंत बिरादार पाटील यांनी केले.

अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कवीवर्य कुसुमाग्रज यांची जयंती व मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून ‘कवी संमेलन व कथाकथन ‘ या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपाप्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील बोलत होते. यावेळी विचारमंचावर शीघ्रकवी तथा उपप्राचार्य प्रो डॉ . दुर्गादास चौधरी, ज्येष्ठ कवि डॉ. डी . एन . माने , ज्येष्ठ कवि डॉ .मारोती कसाब , कवि अजय मुरमुरे, कवि प्रा . कल्पना कदम, कवि वैष्णवी मुंढे, कवी सत्यशीला स्वामी , कवी प्रतीक्षा राठोड, कवी वनिता नरवटे आदी निमंत्रित कवींसह कार्यक्रमाचे संयोजक प्रो. डॉ . अनिल मुंढे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलतांना प्राचार्य डॉ . वसंत बिरादार पाटील म्हणाले की, आम्ही मराठी भाषेचे पाईक आहोत पण आपण पाईकपणा किती निभवितो ? हा मोठा प्रश्न आहे. सर्रासपणे मराठी भाषिक ही आपल्या भाषेला दुय्यम स्थान देऊन हिंदी, इंग्रजी आदी भाषेचा वापर करतात ही खेदाची बाब आहे . तसेच ते म्हणाले की, विष्णुशास्त्री चिपळूणकर मराठीचे शिवाजी होऊ शकत नाहीत कारण त्यांची मराठी बारा बलुतेदार, अठरा आलुतेदार, दिनदुबळ्यांची, वंचितांची नसून मुठभर लोकांची होती.मराठीचे खरे शिवाजी महात्मा फुलेच होऊ शकतात असेही ते म्हणाले. यावेळी कु .प्रतीक्षा राठोड यांनी ‘सुंदर अश्रू ‘, कु. वनिता नरवटे यांनी ‘होय ! मी चंद्रभागा बोलते ‘, प्रा .कल्पना कदम यांनी ‘माय’, कु. सत्यशीला स्वामी यांनी ‘अंतिम सत्य ‘, कु . वैष्णवी मुंढे यांनी ‘बाया ‘, अजय मुरमुरे यांनी ‘झोपडी’, उपप्राचार्य डॉ.दुर्गादास चौधरी यांनी ‘आई-वडील’ तसेच डॉ. डी. एन. माने यांनी ‘आरसा’ तर डॉ. मारोती कसाब यांनी’ शिवराया, तुम्ही पुन्हा जन्मा यावे ‘ या कवितेच्या माध्यमातून सामाजिक,राजकीय, सांस्कृतिक तसेच मानसिक भाव -भावनांना मूक्तपणे व्यक्त केले. यावेळी मराठी विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘आविष्कार ‘ व समाजशास्त्र विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘संस्कार’ या भित्तीपत्रका चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक ह .भ .प . प्रो. डॉ . अनिल मुंढे महाराज यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ . बब्रुवान मोरे यांनी व आभार डॉ . मारोती कसाब यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *