मारूती सुझुकी सेलेरिओ कारची मोटार साईकलला पाठीमागुन जोराची धडक; अपघातात तीन जण ठार

0
मारूती सुझुकी सेलेरिओ कारची मोटार साईकलला पाठीमागुन जोराची धडक; अपघातात तीन जण ठार

मारूती सुझुकी सेलेरिओ कारची मोटार साईकलला पाठीमागुन जोराची धडक; अपघातात तीन जण ठार

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील शिरूर ताजबंद जवळील अजनी पाटी जवळ मारूती सुझुकी सेलेरिओ कारची मोटार साईकलवरून जाणाऱ्या तिघांना पाठीमागुन जोराची धडक दिल्यामुळे मोटार साईकल वरील दोघांचा जागीच मृत्यु झाला असुन एकाचा लातुर येथील दवाखाण्यात उपचारा दरम्यान मृत्यु झाल्याची घटना दि १ मार्च रोजी संध्याकाळी घडली आहे.
याविषयी सविस्तर माहीती अशी की, अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद जवळील अजनी पाटी जवळ लातुर- नांदेड महामार्गावर दि १ मार्च रोजी संध्याकाळी अंदाजे ७ : ३० ते ८ : ०० च्या सुमारास एम.एच २४ बिटि ३१४० क्रमांकाच्या हिरो स्पेंल्डर या मोटार साईकल वर तेलगाव ता अहमदपूर येथील तीघे जण शिरूर ताजबंद कडे काही कामानिमित्त येत असताना लातुर कडून शिरूर ताजबंद कडेच भरधाव वेगाने येणाऱ्या एम.एच २४ बिसि ३६११ मारूती सुझुकी कंपनीच्या सेलेरिओ कारने पाठीमागुन येऊन मोटार सायकलला जोराची धडक दिली या धडकेत सचिन दिलीप खिडसे वय ३५ वर्षे, अंकुश भागुराम सुरकुटे वय ५५ वर्षे रा तेलगाव ता अहमदपूर हे दोघेही जागीच ठार झाले तर गोपाळ प्रकाश येनगे वय ३० वर्षे रा तेलगाव ता अहमदपूर याचा लातुर येथील दवाखाण्यात उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे.
सदरील घटना अहमदपूर पोलीसांना समजताच पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून दोन्हीही वाहने पोलीस स्टेशनच्या आवारात आणुन जमा करण्यात आले आहेत.
याविषयी अहमदपूर पोलीस स्टेशन येथे सदरील घटनेची चौकशी केली असता सदर अपघाताची फिर्याद आली नसल्याचे कारण सांगण्यात आले फिर्यादीने फिर्याद दिल्यानंतरच अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात येईल असे पोलीसांनी सांगीतले
एकाच गावातील तिघांचा असा अपघाती दुर्देवी मृत्यु झाल्यामुळे अहमदपूर तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *