अट्टल चोर, दरोडेखोर, घरफोड्या करणाऱ्या पाच आरोपींना अटक

अट्टल चोर, दरोडेखोर, घरफोड्या करणाऱ्या पाच आरोपींना अटक

पंच्याण्णव तोळे सोने जप्त

पुणे (केशव नवले) : येथील पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिटने पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट कामगिरी करून वेगवेगळ्या गुन्ह्यातील पाच आरोपींना अटक करून त्यांच्याजवळून चोरीस गेलेले पंच्याण्णव तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. ज्याची अंदाजे किंमत 47 लाख 50 हजार रुपये होते. गुन्हे शाखा युनिट पाचच्या विशेष पथकाने पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा सुधीर हिरेमठ, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळी, पोलीस कर्मचारी धनराज किरनाळे, सावन राठोड, दत्तात्रय बनसोडे, नितीन बहीरट, ज्ञानेश्वर गाडेकर, भरत खेडकर, धनंजय भोसले, संदीप ठाकरे, राजकुमार  इघारे, गणेश मालुसरे, गोपाळ ब्रह्मदे, नागेश माळी, विकास आवटी, पोपट हुलगे यांच्या पथकाने अट्टल गुन्हेगार असलेल्या अजित व्यंकप्पा पवार उर्फ लिंग्या, आप्पा राम भोसले, पायल आप्पा भोसले उर्फ सारीका संतोष चौगुले, अजय रिका उर्फ राहुल पवार, अक्षय मंगेश शिंदे या पाच आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अटक केली आहे.

  अट्टल घरफोडी करणारे खिडक्यांचे गज कापून आत प्रवेश करणारे आणि मोठी घरफोडी, चोरी, दरोडा झाल्यानंतर लगेच पुणे परिसर सोडून औरंगाबाद, सोलापूर, उस्मानाबाद अशा भागात जाऊन लपून राहणारे या सदरील आरोपींच्या संदर्भात गुप्त बातमीदारा मार्फत माहिती काढून या विशेष पथकाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. लाखो रुपयांचा गेला माल पुणे येथील पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाच शाखा पथकाने केल्याबद्दल पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

About The Author