लाखो रुपयांचा तंबाखूजन्य गुटखा जप्त

लाखो रुपयांचा तंबाखूजन्य गुटखा जप्त

पुणे (रफिक शेख) : येथिल निगडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची साठवणूक करणे, त्याची वाहतूक करणे, विक्री करणे अशा प्रकारचे उद्योग धंदे चालू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाल्यानंतर निगडी आणि चिखली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैधरित्या तंबाखूजन्य गुटख्याची वाहतूक, विक्री करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने कडक कारवाई केली आहे.

 निगडी परिसरातील अतुल दिलीप छाझेड आणि नितीन हिरालाल छाझेड यांच्याकडून एक लाख 45 हजार सहाशे पन्नास रुपयांचा गुटका आणि नऊ लाख 35 हजारांची दोन कार एक दुचाकी अशी वाहने जप्त केली आहेत. याप्रकरणी आरोपी यांच्याविरुद्ध भारतीय दंडविधान संहितेच्या कलम 328, 272, 273, 188, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तळवडे परिसरात दोन ठिकाणी गुटख्याची साठवणूक आणि विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणावरून दोन लाख 24 हजार 884 रुपयांचा गुटका आणि 1900 रुपये रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी सचिन मोहनराव भापकर, मांगीलाल कृपाराम सोळंकी यांच्याविरोधात भारतीय दंडविधान संहितेच्या 328, 272, 273, 188, 34 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये एकूण 13 लाख पाच हजार 534 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

 वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोलिस उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे, पोलीस कर्मचारी विजय कांबळे, संतोष बर्गे, सुनील शिरसाट, नितीन लोंढे, अनील महाजन, संगीता जाधव, मारुती करचुंडे, जालिंदर गारे, गणेश कारोटे, सोनाली माने या पथकाने ही कारवाई केली आहे.

About The Author