शासनाच्या नाकर्तेपणामुळे ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला – आ. रमेशअप्‍पा कराड

शासनाच्या नाकर्तेपणामुळे ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला - आ. रमेशअप्‍पा कराड

लातूर (एल.पी.उगीले) : घटनेने ओबीसी समाजाला दिलेले आरक्षण राज्‍यातील शासनाच्‍या दुर्लक्षामुळे रद्द झाले आहे. रद्द झालेले आरक्षण सन्‍मानाने परत मिळवे, यासाठी भारतीय जनता पार्टीच्‍या वतीने २६ जून २०२१ शनिवार रोजी जिल्‍हाभरात चक्‍काजाम आंदोलन करण्‍यात येणार आहे. तेव्‍हा या आंदोलनात  ओबीसी समाजासह सर्वांनी हजारोंच्‍या संख्‍येनी सहभागी होऊन शासनाविरूध्‍द आक्रोश व्‍यक्‍त करावा. असे आवाहन भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांनी केले आहे.

आरक्षण हा समाजाचा नव्‍हे तर उपेक्षित ओबिसीच्या जिव्‍हाळयाचा प्रश्‍न आहे. छत्रपती शाहू महाराजांनी अप्रगत असलेल्‍या समाजाला पुढे आणण्‍यासाठी आरक्षण देवून सन्‍मान केला. मात्र राज्‍यातील महाविकास आघाडी शासनाच्‍या दर्लक्षामुळे,नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द झाले. यामुळे येणाऱ्या स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थेच्‍या कोणत्‍याही निवडणूकीत ओबीसीचा उमेदवार दिसणार नाही. असे सांगून रमेशअप्‍पा कराड म्‍हणाले की, घटनेने दिलेले आरक्षण ओबीसी समाजाला परत सन्‍मानाने मिळावे. यासाठी भारतीय जनता पार्टीच्‍या वतीने लातूर जिल्‍हयातील सर्वच विधानसभा मतदार संघात चक्‍काजाम आंदोलन करण्‍यात येणार आहे.

लातूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात होणाऱ्या आंदोलनात माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर आणि जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांच्‍या नेतृत्‍वात चक्‍काजाम आंदोलन होणार असून जिल्‍हाभरातील विविध ठिकाणच्‍या आंदोलनात त्‍या त्‍या भागातील भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी आणि पक्षाचे पदाधिकारी नेतृत्‍व करणार आहेत. लातूरसह सर्वच ठिकाणच्‍या  आंदोलनाची जय्यत तयारी करण्‍यात आली असून आपल्‍या न्‍याय हक्‍काच्‍या मागण्‍यासाठी ओबीसी समाजातील बांधवासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, नागरीक हजारोंच्‍या संख्‍येने रस्‍त्‍यावर उतरणार आहेत. लातूरसह जिल्‍हाभरातील ओबीसीच्‍या प्रश्‍नावर होणारे चक्‍काजाम आंदोलन राज्‍यात लक्षवेधी व्‍हावे यासाठी अनेकजण मेहनत घेत आहेत.लातूर जिल्ह्यातील सुजान जनतेने ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभाग घ्यावा,असे आवाहन आ.रमेशअप्पा कराड यांनी केले आहे.

About The Author