महावितरणच्या पॉवर ट्रान्सफार्मरला आग
शहरासह काही ग्रागीण भागाचा विद्युत पुरवठा खंडीत
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महावितरण उपविभागातील शहरासह ग्रामीण भागास विद्युत पुरवठा करणारा एक पॉवर ट्रान्सफार्मरला दि. ३ मार्च रोजी दु. ३ : ३० वाजण्याच्या सुमारास भिषण आग लागुन जळुन खाक होऊन लाखोचे नुकसान झाल्याची घटना घडली असुन शहरासह ग्रामीण भागाचा विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे.
याविषयी सविस्तर माहिती अशी की, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादीत महावितरण उपविभाग अहमदपूर शहरातील कार्यालयाच्या परिसरातील अर्ध्या शहराला विद्युत पुरवठा करणारा पॉवर ट्रान्सफार्मरला दि. ३ मार्च रोजी दुपारी उन्हाच्या कडाक्यात अंदाजे ३ : ३० वाजण्याच्या सुमारास भिषण आग लागुन जळुन खाक होऊन लाखोचे नुकसान झाले असुन अहमदपूर शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागातील गावांचा विद्युत पुरवठा खंडीत झाल्याची माहीती समजते
या संदर्भात संबंधीत विभागातील अधिकारी तसेच कर्मचारी यांच्याकडे विचारपुस केला असता आगीचे नेमके कारण अद्याप समजले नाही . एक तर रविवार हा सुट्टीचा दिवस असल्यामुळे मोजकेच अधिकारी, कर्मचारी आपल्या कर्तव्यावर होते यापैकीच एका अधिकाऱ्याने नगरपालिका अग्नीशमन दलास पाचारण करून बोलावुन घेतल्याने अग्नीशमन दलातील कर्मचारी सोनकांबळे कैलास, लाळे अजित, जाधव प्रकाश, गायकवाड प्रशांत यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.
परंतु सदरील जळुन खाक झालेला पॉवर ट्रान्सफार्मर दुरूस्त होण्यासाठी अयोग्य असल्याने नविन ट्रान्सफार्मर बसवण्यात किती वेळ लागेल याची चिंता शहर वासीयांना भेडसावत आहे .
विशेष म्हणजे या आगीमुळे ट्रान्सफार्मरमधील ऑईलचे फवारे उडून महावितरण कार्यालयाच्या परिसरातील गवतासही आग लागल्यामुळे थोडा वेळ परिसरात भितीचे वातावरण पसरले होते आग इतकी भिषण होती की शहरात सर्वत्र काळ्या काळ्या धुराचे लोट पसरल्याने शहरातील नागरीकांनी आग बघण्यासाठी महावितरण परिसरात एकच गर्दी केली होती.
या संदर्भात महावितरणचे उप- कार्यकारी अभियंता दिनकर पिसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगीतले की, पॉवर ट्रान्सफार्मरला आग कश्यामुळे लागली आहे हे तपासणी पथकाने तपासणी केल्यानंतरच स्पष्ट कारण समजेल लवकरच काही भाग वगळता खंडीत केलेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येईल अशी प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधिशी बोलताना दिली
घटनास्थळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव
शिवसेना ( उबाठा ) जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी भेट देऊन विद्युत पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्याच्या अधिकाऱ्यांना सुचना दिल्या.