विभागीय सहनिबंधकाच्या निर्णयाने हुडे यांना धक्का !

0
विभागीय सहनिबंधकाच्या निर्णयाने हुडे यांना धक्का !

विभागीय सहनिबंधकाच्या निर्णयाने हुडे यांना धक्का !

उदगीर (प्रतिनिधी) : लातूर येथील विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था यांनी स्वाती सचिन हुडे यांचा नूतनीकरणाच्या संदर्भातील अर्ज फेटाळून लावत, एस एच हुडे या फर्मचे प्रोप्रायटर शिवाजी हनुमंतराव हुडे हेच असल्याचे निरीक्षन यापूर्वी तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नोंदवले होते, ते कायम ठेवले आहे. त्यामुळे सभापती शिवाजीराव हुडे यांना हा निकाल म्हणजे एक प्रकारचा धक्काच असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहे.
याबाबत थोडक्यात माहिती अशी की, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीने दिनांक 30 मे 2019 रोजी शिवाजी हनुमंतराव हुडे यांना अनुज्ञप्ती नूतनीकरणाच्या बाबतचा ठराव घेऊन दिनांक 9 जुलै 2019 रोजी पत्र दिले होते. तसेच या संदर्भाने यापूर्वी स्वाती सचिन हुडे यांनी दाखल केलेला नूतनीकरणाचा अर्ज प्रलंबित ठेवला होता. तसेच स्वाती सचिन हुडे यांना नूतनीकरणाचा अर्ज करता येणार नाही. असे सूचित केले होते.
या पत्राच्या विरुद्ध स्वाती सचिन हुडे यांनी उपविभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लातूर यांच्याकडे अपील दाखल केले होते. या अपीलाची सुनावणी होऊन, सर्व पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेऊन महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. या निकालात निष्कर्ष व अभिप्राय नोंदवताना स्पष्ट केले आहे की, 2017 च्या संचालक मंडळाच्या निवडणुकात शिवाजी हूडे यांना तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ते मे. एस एच हूडे या फर्मचे प्रोप्रायटर असून व्यापारी असल्याचे नमूद केले होते. व निवडणुकांमध्ये त्यांचा सहकारी संस्था मतदार संघातील अर्ज अवैध ठरवला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या या निकालाच्या विरुद्ध शिवाजी हुडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. मात्र तेथेही त्यांना दिलासा मिळाला नाही. त्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द झाली होती. या संदर्भात उच्च न्यायालयाने शिवाजी हुडे यांना योग्य त्या प्राधान्यकरणाकडे दाद मागण्याची मुभा देऊन त्यांना व्यापारी असल्याचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा निर्णय कायम ठेवला होता.
उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तत्कालीन संचालक मंडळांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत दिनांक 30/ 5/ 2019 रोजी ठराव घेतला होता, व शिवाजी हूडे यांना एस एच हूडे या फर्मच्या अनुज्ञप्ती नूतनीकरणाचे पत्र दिले होते. तसेच स्वाती सचिन हुडे यांना नूतनीकरण करता येणार नाही, असे पत्र दिले होते. या ठरावाच्या विरुद्ध एक जानेवारी 2023 रोजी स्वाती सचिन हुडे यांनी विधीज्ञ डी एस पांचाळ यांच्यामार्फत विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लातूर यांच्याकडे अपील दाखल केले होते. त्या अपिलावर दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी सुनावणी होऊन स्वाती सचिन हुडे यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला आहे, व स्वाती सचिन हुडे यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला आहे. या निकालामुळे शिवाजी हूडे यांना धक्का असल्याचे मत उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सहकार महर्षी भगवानदादा पाटील तळेगावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *