उदगीर विधानसभेचा विकास की, विकासाचा आभास ? – संजय राठोड

0
उदगीर विधानसभेचा विकास की, विकासाचा आभास ? - संजय राठोड

उदगीर विधानसभेचा विकास की, विकासाचा आभास ? - संजय राठोड

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी प्रचंड असा निधी उदगीर विधानसभेच्या विकासासाठी खेचून आणला. उदगीरचा प्रचंड असा विकास केला, अशा चर्चा होत असताना आज उदगीर विधानसभेतील जळकोट तालुक्यातील तिरुका येथील तिरु नदीवरील बॅरेजला भेट दिल्यानंतर बॅरेजेसमध्ये पाणी शिल्लक नसल्याचे आढळले. मग तिरू नदीवरील 106 कोटी खर्च करून जे सात बॅरेजस तयार करण्यात आले, त्या पैशातून कोणता विकास साधला गेला? उदगीर विधानसभेचा की गुत्तेदारांचा, अधिकाऱ्यांचा की आणखी कोणाचा? हा प्रश्न या ठिकाणी अधोरेखित होतो. असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केला आहे. याप्रसंगी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, ज्यावेळी शेतकऱ्यांना बॅरेजमधल्या पाण्याची खरी आवश्यकता असते, त्याचवेळी बॅरेजेसमध्ये पाणी शिल्लक नाही. मग या पैशाच्या माध्यमातून विकास झाला का विकासाचा आभास निर्माण करण्यात आला? उदगीर विधानसभेत सर्वाधिक निधी आणण्याचे रेकॉर्ड जसे ना. संजय बनसोड यांच्या नावावर जाईल, तसेच त्यांच्याच कार्यकाळात वादग्रस्त आणि सर्वाधिक निकृष्ठ दर्जाची कामे सुध्दा त्यांच्याच काळात झाली. हे सुध्दा रेकॉर्ड ना. संजय बनसोडे यांच्याच नावावर जाईल. असेही संजय राठोड यांनी सांगितले. कर्म धर्म संयोगाने उदगीर विधानसभा मतदारसंघाच्या प्रतिनिधीला कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. विकासाची जाण असलेल्या व्यक्तीला हे पद मिळाल्यामुळे त्यांनी या मतदारसंघाचा विकास व्हावा म्हणून चौफेर विकास निधी आणला, मात्र धर्माचा एक कुत्रा आडवा म्हणावा तसे, या विकास निधीला भ्रष्ट प्रवृत्तीच्या कंत्राटदाराची नजर लागली आणि हा निधी मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाच्या कामात वापरला गेल्याचा आरोपही संजय राठोड यांनी केला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *