बालक हे देशाचे भवितव्य – ना. संजय बनसोडे

0
बालक हे देशाचे भवितव्य - ना. संजय बनसोडे

बालक हे देशाचे भवितव्य - ना. संजय बनसोडे

उदगीर (एल. पी. उगिले) : देशातील लहान बालके हे देशाचे भवितव्य असून त्यांची काळजी घेणे हे राष्ट्रीय कार्य असल्यामुळे त्याला प्राधान्य देत, शासनाच्या वतीने पल्स पोलिओ ही मोहीम राबवली जात आहे. अर्थात लहान बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस देऊन पोलिओ पासून कायमस्वरूपी मुक्ती मिळावी यासाठी ही मोहीम सुरू केली आहे. असे विचार राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार ना. संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते उदगीर तालुक्यातील तपोवन मठ, खोरीचा महादेव, तोंडार या ठिकाणी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे जिल्हास्तरावरील उद्घाटन करतेवेळी बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, अन्न; वस्त्र; निवारा या सोबतच आरोग्य आणि शिक्षण या देखील आता प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत गरजा बनल्या आहेत. आणि या महत्त्वपूर्ण गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. आजचे बालक हे उद्याचे राष्ट्राचे नागरिक आहेत, त्यामुळे त्यांचे भवितव्य जतन करण्यासाठी पल्स पोलिओ मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेमध्ये जेव्हा जेव्हा शासनाच्या वतीने आवाहन केले जाईल, त्या त्या वेळेस नागरिकांनी सहकार्य करावे. असेही आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले आणि आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशातील सर्व नागरिकांनी राष्ट्रीय कार्यामध्ये हिरीरीने सहभाग नोंदवावा. जेणेकरून प्रत्येक राष्ट्रीय कार्यामध्ये आपला हातभार लावला जाईल, शासनाच्या लोककल्याणकारी योजना खऱ्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवल्या जातील यासाठी आपण प्रयत्न करू या. माझ्या उदगीर विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिक माझ्यासोबत आहेत, राज्यातील ही सर्व नागरिकांनी लोककल्याणकारी योजना लाभार्थ्यापर्यंत पोहोचाव्यात, यासाठी प्रयत्न करावेत, असेही आवाहन ना. संजय बनसोडे यांनी याप्रसंगी केले. ग्रामीण भागात देखील पल्स पोलिओ लसीकरण मोहीम अत्यंत प्रामाणिकपणे आणि युद्ध पातळीवर राबवली जात असल्याबद्दल त्यांनी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे आणि या विभागाला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार ही व्यक्त केले आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *