देवणी भागातील वंचित असणाऱ्या बालकांना पल्स मोहिमेत सहभागी करून बुथ पर्यंत नेणारे पत्रकार लक्ष्मण रणदिवे
देवणी (प्रतिनिधी) : देवणी तालुक्यातील देवणी खुर्द या गावात अंगणवाडी क्रमांक १ येथे जे वीटभट्ट्यावर मजूर कामगार बालक याना सांगण्यासाठी प्रेरक लक्ष्मण रणदिवे यानी खूप मदत केली. झिरो ते पाच वर्षापर्यंतचे लहान बालकांच्या घरी जाऊन समजाऊन सांगून, पोलिओ डोस पाजण्यासाठी आपण अंगणवाडी क्रमांक एक देवणी खुर्द येथे जावे. असे प्रबोधन करण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी गावचे सरपंच यशवंत कांबळे, डॉ.संजय घोरपडे, एस बी गायकवाड आरोग्य सेविका, राजकुमार गरड ग्रामपंचायत सदस्य, दैवशाला कांबळे, सरोजा गायकवाड अंगणवाडी कार्यकर्ती, हौशाबाई सारगे, आयोध्या सूर्यवंशी मदतनीस, शोभा रणदिवे, रंजना रणदिवे आशा कार्यकर्ती,वच्छला सूर्यवंशी, देवणी शहर या शहरामध्ये घिसडी या लोकांपर्यंत जाऊन बालकांना पोलिओ डोस पाजून सहकार्य करणारे व देवणी बस स्थानक या ठिकाणी बुथवर जाण्यासाठी सांगण्यात आले, बस स्थानक बुथवर बी एन मेहत्रे वाहतूक नियंत्रक देवणी, जीवने आशा, नागुरे मंगल आशा कार्यकर्ती,थगनरे महानंदा, खरटमोल कविता अंगणवाडी कार्यकर्ती, आकाश काबळे, ओम श्रीमंगले यांनी विशेष प्रयत्न केले.