राज्यस्तरीय हॅकेथाॅन कोड टेक कोडींग स्पर्धेत मातृभूमीची रुद्राणी पाटील प्रथम
विजेत्याचा मातृभूमी महाविद्यालयात सत्कार
उदगीर (एल.पी.उगीले) : बी.सी.ए. बी. सी. एस. चे विद्यार्थ्यांसाठी लॉयन्स क्लब लातूर आयोजित राज्यस्तरीय हॅकेथाॅन कोड टेक कोडींग स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकाविल्या बद्दल इंद्रायणी पाटील व पूनम कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. लाॅयन्स क्लबच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कोडींग स्पर्धेत इंद्रायणी सतीश पाटील या विद्यार्थींनी ११०००₹ चे पारितोषिक पटकावले तर प्रथम रनर ऑफ पूनम कुलकर्णी यांनी १५००₹ पारितोषिक, स्मृतीचिन्ह मिळविल्याबद्दल मातृभूमी महाविद्यालयाच्या वतीने मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश उस्तुरे, मातृभूमी महाविद्यालयाच्या प्राचार्य उषा कुलकर्णी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रभरातून मोठ्या प्रमाणात स्पर्धक विद्यार्थी सहभागी झाले होते. यातून मातृभूमी महाविद्यालयाच्या रद्राणी पाटील यांनी प्रथम पारितोषिक आणि पूनम कुलकर्णी यांनी प्रथम रनर ऑफ पुरस्कार मिळवल्याबद्दल सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिभीषण मद्देवाड यांनी केले. यावेळी प्रा. सय्यद उस्ताद , प्रा.अश्विनी कुलकर्णी , प्रा. रणजित मोरे, प्रा.संगम कुलकर्णी, प्रा.राजेश चटलावार यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.