कै. रसिका महाविद्यालयामध्ये हिंदी विभागाचे विविध उपक्रम
देवणी (प्रतिनिधी) : कै. रसिका महाविद्यालयामध्ये हिंदी विभागातर्फे वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त काव्यपठन, कथाकथन, दोहा व भाषण स्पर्धा घेण्यात आल्या. काव्य कथन स्पर्धेमध्ये बीकॉम प्रथम वर्षाची विद्यार्थिनी दवणे स्वाती न्यानोबा ही प्रथम आली. मोरे पल्लवी भीम व बोडरे आनंद बापूराव या विद्यार्थ्यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला.
दोहा पठन या स्पर्धेमध्ये धनेगावे श्रावणी महेंद्र या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकाविला असून मोतीरावे सोनाली तानाजी यांनी दुसरा तर म्हेत्रे राधा बापूराव यांनी तृतीय क्रमांक मिळविला. स्नेहसंमेलन कार्यक्रमांमध्ये भाषण स्पर्धा देखील ठेवण्यात आली होती या स्पर्धेमध्ये माने स्नेहा संजय प्रथम तर मोरे मोनिका व बोरोळे प्रणिता यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.
हिंदी साहित्य या विषयावर घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा बीएससी तृतीय वर्षाची विद्यार्थिनी जोहरा मणियार यांनी जिंकली.
हिंदी विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक धनराज बिराजदार यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. पी. आर मोरे उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉ.चंद्रकांत जावळे यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले.