ग्रीन मराठवाडा कॉन्क्लेव्ह मध्ये प्रा. अनिल चवळे यांना “ग्रीन मराठवाडा सन्मान,”
अहमदपूर (गोविंद काळे) : एमआय टी कोथरूड पुणे येथे स्वामी विवेकानंद सभागृहामध्ये ग्रीन मराठवाडा कान्क्लेव्ह 2024 चे आयोजन करण्यात आले. यामध्ये मराठवाड्याच्या विकासासाठी पर्यावरण , या भागातील विद्यार्थ्यांना रोजगार , स्वयंरोजगार देण्याच्या संबंधीने चर्चा झाली.
या कॉनक्लेव मध्ये मराठवाड्यातील पर्यावरण व वृक्ष चळवळीसाठी काम करणाऱ्या व्यक्तीचा ग्रीन मराठवाडा सन्मान देऊन सत्कार करण्यात आला .यावेळी अहमदपूर येथील प्रा. अनिल चवळे यांनी गेले वीस वर्षे पर्यावरण व वृक्ष चळवळीसाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान सुप्रसिद्ध उद्योगपती शिवशंकर लातूरे, दीपक म्हैसेकर (सल्लागार मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य), श्री योगेश भोसले, श्री मिलिंद पाटील ,प्रा. धर्मराज बिराजदार समन्वयक संतोष सिंग यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला .
मराठवाड्यातील पर्यावरण संतुलन ,वृक्ष चळवळ, वृक्ष लागवड व या भागातील समस्या यावर या मध्ये चर्चा करण्यात आली मराठवाड्यातील लोकांनी पुढे येऊन आपल्या भागाच्या विकासासाठी कार्य केलं पाहिजे असेही यावेळी प्रमुख पाहुण्यांनी बोलताना सांगितले.
प्रा. अनिल चवळे यांच्या या सन्मानाबद्दल अहमदपूर मध्ये आनंद व्यक्त करण्यात येत असून याबद्दल टागोर शिक्षण समितीचे सचिव डी बी लोहारे सर ,अध्यक्ष डॉ.अशोकराव सांगवीकर, सहसचिव प्रा. डॉ .सुनिता लोहारे मॅडम , प्राचार्य गजानन शिंदे उपप्राचार्य सय्यद एम यु , पर्यवेक्षक अशोक पेद्देवाड, रामलिंग तत्तापुरे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व रोटरी चे अध्यक्ष शिवशंकर पाटील, सचिव श्रीराम कलमे महिंद्र खंडागळे, राजेसाहेब कदम ,मोहिब कादरी, कपिल बिराजदार ,हरिदास तम्मेवार, बालाजी मुंढे, प्रशांत माने ,दिनकर मद्देवाड, प्रशांत घाटोळ, गंगाधर याचवाड, वैजनाथ गीते यांच्यासह मित्रपरिवार यांनी अभिनंदन केले आहे.