कै. गोपीनाथराव मुंढे कृषी उत्पन्न बाजार समिती संरक्षण भिंतीच्या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न
कै. गोपीनाथराव मुंढे कृषी उत्पन्न बाजार समिती संरक्षण भिंतीच्या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर येथिल कै गौपिनाथ मुंढे कृषी उत्पन्न बाजार समिती च्या २० लाख रुपये किंमतीची संरक्षण भिंतीच्या कामचे भुमिपुजन
आमदार बाबासाहेबजी पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. मतदारसंघातील प्रत्येक ठिकाणी विकास पोहचवण्यासाठी प्रयत्न करत असून जिथे जिथे आवश्यकता असेल, त्याठिकाणी विकासकामे देण्यात कमी पडणार नसल्याचे यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी सभापती मंचकराव पाटील, जिल्हा उपाध्यक्ष शिवानंद तात्या हेंगणे, शिवसेना जिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस सांब तात्या महाजन, हेमंत पाटील, उपसभापती संजयजी पवार, डी.के. जाधव, माधवराव जाधव, जिल्हा सरचिटणीस शिवाजीराव देशमुख, माजी नगराध्यक्ष मुजीबजी पटेल, महेश बँक उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे, महिला अध्यक्षा मीनाक्षीताई शिंगडे, शहराध्यक्ष अझहर बागवान, उपअभियंता भोसले साहेब, काँग्रेस शहराध्यक्ष विकास महाजन विश्वंभरराव पाटील काळेगावकर, जिल्हा युवक कार्याध्यक्ष प्रशांत भोसले, युवक तालुकाध्यक्ष दयानंद पाटील, ग्रा. सदस्य युवराजभैय्या पाटील यांच्यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
