एकंबेकर महाविद्यालयात आजादी का अमृत महोत्सव या विषयावर राष्ट्रीय परिषद
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील कै.बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालयात भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद,मुंबई यांच्या सौजन्याने आणि अर्थशास्त्र विभागाच्या वतीने ” आजादी का अमृत काल: उपलब्धी,संधी आणि आव्हाने” या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न झाली.यामध्ये विविध तज्ज्ञांनी सहभाग नोंदवून भारताच्या स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंतच्या अर्थव्यवस्थेतील बदलावर आपले विचार व्यक्त केले.
या परिषदेचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील आंतरविद्याशाखीय अधिष्ठाता डॉ.सी. आर.बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव डॉ.विजयकुमार पाटील,अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. एल. एच.पाटील,सी.सी.शेठ महाविद्यालय गुजरात येथील डॉ. जगतराव धनगर,डॉ.व्ही. व्हीं. सुकाळे, संस्थेच्या कोषध्यक्षा मृदुलाताई पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ओमप्रकाश क्षीरसागर आणि परिषदेचे समन्वयक डॉ.मदन शेळके उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शोधनिबंध पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले.
बीजभाषण म्हणून उपस्थित असणारे डॉ.व्हि.व्हि.सुकाळे यांनी ब्रिटिश कालखंडापासून ते आज पर्यंतच्या अर्थव्यवस्थेचा संपूर्ण आढावा आपल्या मनोगतातून मांडला.त्यामध्ये त्यांनी सर्व पंचवार्षिक योजनांच्या उद्दिष्ठावर सखोल अशी चर्चा केली. पंचवार्षिक योजनेपासून ते नियोजन आयोग,निती आयोग यावर सविस्तर असे विश्लेषण केले.शेतकऱ्यांच्या संदर्भात मात्र त्यांनी खंत व्यक्त केली.ज्याला पांढरे सोने म्हणून ओळखले जायचे त्या शेतकऱ्यांच्या कापूस या पिकाला 1972 मध्ये सोन्याच्या दराबरोबर किंमत होती. परंतु आज कापसाच्या आणि सोन्याच्या किंमतीत सहा पट तफावत दिसून येते.त्यांनी असे म्हटले की,एकीकडे भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना शेतकरी मात्र दुर्लक्षित आहे. या परिषदेच्या पहिल्या चर्चा सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. दिपक भारती तर साधन व्यक्ती म्हणून डॉ. जयभारत मंगेशकर, डॉ.विशाल बेलुरे उपस्थित होते. दुसऱ्या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. माधव पलमटे तर साधन व्यक्ती म्हणून डॉ.रमाकांत घाडगे, डॉ.पी. आर. मुठे उपस्थित होते.या सत्रात अनेक तज्ञांनी शोधनिबंधाचे वाचन केले.परिषदेच्या समारोपाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.ओमप्रकाश क्षीरसागर होते तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ.शालिनी कदम यांची उपस्थिती होती.परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचर्य डॉ. ओमप्रकाश क्षीरसागर यांनी केले तर सूत्रसंचलन डॉ.गणेश बेळंबे यानी केले.आभार परिषदेचे समन्वयक डॉ.मदन शेळके यांनी मानले.पेपर वाचन सत्राचे सूत्रसंचलन प्रा. संजीवकुमार माने यांनी केले तर आभार डॉ.बाबुराव जाधव यांनी मानले.समारोपाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.रेखा लोणीकर यांनी केले तर आभार डॉ.अनंत शिंदे यांनी मानले. या परिषदेसाठी विविध महाविद्यालयातील प्राध्यापक,संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.परिषदेच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिकेत्तर कर्मचारी यांनी खूप मेहनत घेतली.