घरफोडीच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगाराला, 2 लाख 25 हजार रुपयाच्या सोन्याचे 90 ग्राम वजनाचे दागिनेच्या मुद्देमालासह अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
लातूर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्ह्यातील घोरफोडी प्रकरणाचा तपास करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्या सूचनांचा विचार करून स्थानिक गुन्हे अनिवेषण विभागाने उत्कृष्ट कारवाई करत घरफडीच्या गुन्ह्यातील गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून गेला माल दोन लाख 25 हजार रुपयांचे सोन्याचे 90 ग्रॅम वजनाचे दागिने हस्तगत केले आहेत.
याबाबत थोडक्यात माहिती की, लातूर जिल्ह्यातील वेग-वेगळ्या पोलीस ठाणे हद्दी मध्ये रात्रीच्यावेळी राहते घराचा कडी-कोंडा तोडून घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. त्यावरून जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते.
सदरचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आदेशित केले होते. त्यावरून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे ,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अमलदारांचे पथके तयार करून त्यांना सखोल मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या होत्या.
सदर पथकाकडून गुन्ह्या संदर्भात बारकाईने तपास सुरू असताना मोठ्या प्रमाणात बातमीदार नेमून तसेच तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेण्यात येत होते. वरिष्ठांचे मार्गदर्शनात सदरच्या पथकांनी केलेल्या परिश्रमामुळे पथकांना गुप्त बातमीदाराकडून घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती मिळाली.
घरफोडीतील व पोलिसांवर चाकू हल्ला केलेला कुख्यात गुन्हेगार त्याने चोरलेला सोन्याचा मुद्देमाल विकण्या साठी निलंगा तालुक्यातील हाडगा ते निलंगा जाणाऱ्या रोडच्या परिसरात फिरत आहे, अशी माहिती मिळाली. सदर माहितीची खातरजमा करून सदरचे पथक तात्काळ रवाना करण्यात आले.
सदर पथकाने निलंगा येथे पोहोचून हाडगा ते निलंगा जाणाऱ्या परिसरात फिरत असलेल्या संशयित आरोपीला ताब्यात घेतले. सदर पथकांनी अतिशय कुशलतेने सापळा लावून घरफोडीच्या गुन्ह्यातील व पोलिसांवर चाकू हल्ला केलेला कुख्यात आरोपीला दिनांक 05/03/2024 रोजी ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव नामदेव किशन भोसले,(वय 24 वर्ष, राहणार मंग्याळतांडा, तालुका मुखेड जिल्हा नांदेड) असे असल्याचे सांगितले.
त्याच्याकडे असलेल्या पिशवीची झडती घेतली असता त्यामध्ये सोन्याचे वेगवेगळे दागिने दिसून आले. त्याबाबत त्याच्याकडे विचारले तेव्हा त्याने त्याच्या इतर आणखीन दोन साथीदारासह मिळून लातूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घरफोडीचे गुन्हे केल्याचे व त्या गुन्ह्यामध्ये चोरलेला, त्याच्या वाट्याला आलेले सोन्याचा दागिन्याचा मुद्देमाल व रोख रक्कम असल्याचे कबूल केले.
लातूर जिल्ह्यात घडलेल्या घोरफोडीच्या गुन्ह्याच्या अभिलेखाची पाहणी केली असता नमूद आरोपीनी पोलीस ठाणे कासार शिरशी,औसा, किल्लारी येथील एकूण तीन घरफोडी चे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
तसेच पोलीस ठाणे निलंगा येथे चोरी करण्याच्या प्रयत्नात असताना निलंगा पोलिसांनी नमूद आरोपींना ताब्यात घेत असताना पोलिसावर चाकू हल्ला करून पळून गेले होते. त्यावरून पोलीस ठाणे निलंगा येथे भादवि कलम 307, 353, 332 506 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचे गुन्हेगार हे दिवसा ऊस तोडीचे काम करत व रात्री रेकी करून घरफोडीचे गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. नमूद आरोपीस त्याने इतर साथीदाराच्या सोबत चोरलेल्या 90 ग्राम सोन्याचे दागिने 02 लाख 25 हजार रुपयाच्या मुद्देमालासह पुढील कारवाई करिता पोलीस ठाणे कासारशिरशी यांचे ताब्यात देण्यात आले आहे. असून त्याच्या सोबत असलेल्या फरार आरोपी साथीदाराचा शोध सुरू आहे.
वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस पथकांनी अतिशय उत्कृष्टरित्या तपास करून दिवसा ऊस तोडीचे काम करून रात्री घरफोडी करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड, पोलीस अमलदार माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, मोहन सुरवसे, राजेश कंचे, रामभाऊ मस्के, तुराब पठाण, जमीर शेख, संतोष खांडेकर, नकुल पाटील यांनी केली आहे.