लाल बहादुर शास्त्री विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील लाल बहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालय उदगीर येथे संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान,महाराष्ट्र- गोवा यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या संस्कृतीज्ञान परीक्षेत चार विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक प्राप्त केले.इयत्ता 7वी तून सर्वप्रथम रोहित विष्णू पाटील, इयत्ता 6वी तून सर्वप्रथम व्यंकटेश प्रमोद केंद्रे, इयत्ता 5वी तून सर्वप्रथम वेदांत नवनाथ मोरखंडे,, इयत्ता 4थी तून 100%गुण घेऊन सर्वप्रथम सार्थक मनोज मरेवार यांनी गोल्डमेडल व प्रमाणपत्र प्राप्त केले आहे.
याबद्दल विद्यालयातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. शाळाबाह्य परीक्षा प्रमुख तथा लाल बहादुर शास्त्री विद्यालयातील या परीक्षेच्या प्रमुख म्हणून नीता मोरे, माधव केंद्रे यांचा सत्कार करण्यात आला. विजया गोविंदवाड व आशा मोरे यांनी या परीक्षेसाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा स्थानिक समन्वय समितीचे कार्यवाह शंकरराव लासुने, प्राथमिक शालेय समितीचे अध्यक्ष व्यंकटराव गुरमे, या परीक्षेचे संयोजक संतोष कुलकर्णी, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अंबादास गायकवाड, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे, उपमुख्याध्यापक संजय कुलकर्णी, पर्यवेक्षक माधव मठवाले या मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष मधुकरराव वट्टमवार, माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष सतनप्पा हुरदळे, पर्यवेक्षक लालासाहेब गुळभिले, कृष्णा मारावार यांनी शुभेच्छा दिल्या.
नैतिक शिक्षण योजनेअंतर्गत, नैतिक शिक्षणाचा प्रचार व प्रसार केला जातो. परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जीवनमूल्य रुजवण्याचा प्रयत्न होतो. इयत्ता पाचवी साठी संतकथा, सहावी साठी चरित्र रामायण, सातवीसाठी कथारूप महाभारत व आठवीसाठी क्रांतिगाथा या कथा पुस्तकांवर आधारित परीक्षा घेण्यात आली.