शास्त्री विद्यालयाच्या 14 विद्यार्थ्यांना पारितोषिक
उदगीर (एल.पी.उगीले) : इस्कॉनच्या व्हॅल्यू एज्युकेशन कॉन्टेस्ट, श्रीमद्भगवद्गीता पाठांतर लेखी स्पर्धेत, लाल बहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालययाच्या तब्बल 14 विद्यार्थ्यांना पारितोषिक प्राप्त झाले आहे. लाल बहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालय उदगीर येथे, इस्कॉन तर्फे श्रीमदभगवतगीता पाठांतर लेखी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत विद्यालयाने भरघोस यश प्राप्त केले.उत्कृष्ट सहभागी शाळा म्हणून प्रथम पारितोषिक, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह विद्यालयाला प्राप्त झाले. स्पर्धेत सर्वप्रथम क्रमांकाची सायकल व प्रमाणपत्र देवव्रत रमेश माने या विद्यार्थ्यांला प्राप्त झाले. चौथ्या क्रमांकाचे दोन हजार रुपयाचे पारितोषिक साक्षी श्रीकांत कुलकर्णी या विद्यार्थिनीला प्राप्त झाले. तर सातव्या क्रमांकाचे पारितोषक (टी-शर्ट) कृष्णा शिवाजी हंचनाळे या विद्यार्थ्याला प्राप्त झाले. तसेच वीरेंद्र विष्णू तेलंगे,पृथ्वीराज उटकुरे,अंकिता मोरतळे,पृथ्वीराज पाटील, नीलकृष्ण माने,आर्यही जाधव, सोमेश्वर लिंबाळे, स्नेहा केंद्रे,सायली पाटील, अंबिका ढोबळे यांनाही विशेष पारितोषिक प्राप्त झाले. याबद्दल विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. श्रीमद् भगवद्गीता स्पर्धेचे प्रमुख म्हणून विद्यालयातील नीता मोरे व किरण नेमट या शिक्षकांचा सत्कार,केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा स्थानिक समन्वय समितीचे कार्यवाह शंकरराव लासुणे, प्राथमिक शालेय समितीचे अध्यक्ष व्यंकटराव गुरमे,माध्यमिक शालेय समितीचे पूर्व अध्यक्ष संतोष कुलकर्णी, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अंबादास गायकवाड, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे ,उपमुख्याध्यापक संजय कुलकर्णी, पर्यवेक्षक माधव मठवाले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष मधुकरराव वट्टमवार, माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष सतनप्पा हुरदळे, पर्यवेक्षक लालासाहेब गुळभिले, कृष्णा मारावार यांनी शुभेच्छा दिल्या.