ग्राम विकासासाठी जल, जंगल, जमीन आणि जनावर व्यवस्थापन आवश्यक रासेयो जिल्हा समन्वयक डॉ. केशव अनगुले
लातूर (प्रतिनिधी) : ग्राम विकासासाठी जल, जंगल, जमीन आणि जनावर यांचे व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन रासेयो लातूर जिल्हा समन्वयक डॉ. केशव अनगुले यांनी केले. महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि ग्रामपंचायात कार्यालय, जवळा बु. यांच्यावतीने आयोजित युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास या विशेष युवक शिबिराच्या समारोप प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे हे होते तर विचारपीठावर माजी प्राचार्य प्रा. गिरजाप्पा मुचाटे, रासेयो सल्लागार प्रा. बी. एस. पळसकर, सरपंच चनबस भुजबळ, उपसरपंच मनोज कापरे, शालेय समितीचे उपाध्यक्ष दत्तप्रसाद बनाळे, पोलीस पाटील डॉ. पी आर. ढगे, तंटामुक्तीचे अध्यक्ष चनबस ब्याळे, प्रगतिशील शेतकरी भैरवनाथ सव्वाशे, पत्रकार दत्ता बनाळे, ग्रामसेवक प्रदीप सूर्यवंशी, कार्यक्रमाधिकारी डॉ. रत्नाकर बेडगे, डॉ. शिवप्रसाद डोंगरे, डॉ. मनोहर चपळे, प्रा. किसनाथ कुडके आदीची उपस्थिती होती. कार्यक्रमाचा प्रारंभ कु. शिवाली मुकडे आणि कृष्णा धरणे यांनी गायलेल्या प्रार्थनेने झाला.
पुढे बोलताना डॉ. अनगुले म्हणाले की, भारत हा तरुणांचा देश आहे. सकारात्मक, ध्येयवादी, समर्पित, त्यागी आणि दूरदृष्टीचे तरुण घडवण्याकरिता राष्ट्रीय सेवा योजना ही एक कार्यशाळा आहे. भारताचे महाशक्ती होण्याचे स्वप्न तरुणच पूर्ण करू शकतात असेही ते म्हणाले. यावेळी माजी प्राचार्य प्रा. गिरजाप्पा मुचाटे म्हणाले की, समाज उत्कृष्ट व शाश्वत विकासाच्या कामाची नेहमी दखल घेत असतो. देशभरातील राष्ट्रीय सेवा योजना सामाजिक बांधिलकी जोपासत राष्ट्र विकासाचे काम करत आहे. यावेळी प्रा. बी. एस. पळसकर म्हणाले की, गावाचे नेतृत्व हे दूरदृष्टी आणि संवेदनशील व्यक्तीकडे असल्यास ग्राम विकास हा निश्चित होतो. मराठवाड्यात जल व्यवस्थापनाचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवावा लागेल, प्रत्येक गावात जल संवर्धनाकरिता लघुबंधारे, तलाव, नाला सरलीकरण, रुंदीकरण, पाणलोट, क्षेत्र विकास, वृक्ष संवर्धन करावे लागेल असेही ते म्हणाले. अध्यक्षीय समारोपात उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे म्हणाले की, ग्रामीण भागाच्या विकासात प्रगत बलशाली विकसित देशाची पानमुळे आहेत. ग्रामीण जीवन जितके स्वावलंबी, आत्मनिर्भर आणि स्वयंपूर्ण होईल तितकाच सामर्थ्यशाली भारत उभा राहील. ग्रामीण भारतात प्रचंड ऊर्जा शक्ती आहे. या ऊर्जा शक्तीचा विनीयोग देशाच्या शाश्वत विकासासाठी करायला हवा असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अहवाल वाचन कार्यक्रमाधिकारी डॉ. रत्नाकर बेडगे यांनी केले.
यावेळी पत्रकार दत्ता बनाळे, कृष्णा धरणे, राखी इंगळे, धनश्री भंडे, शिवानी काळे, अजय राऊत यांनी मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी प्रा. किसनाथ कुडके यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. मनोहर चपळे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता योगेश मोदी, दत्ता खुणे, व्यंकट खुणे, अजय स्वामी, अजय राऊत, प्रथमेश जाधव, शैलेश जाधव, ऋतुजा भिसे, वैष्णवी कांबळे, धनश्री बंडे, श्रेया बोडके यांच्यासह ग्रामस्थ व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.