माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा लातुर, धाराशिव दौरा
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा लातुर, धाराशिव दौरा
लातुर (दयानंद स्वामी) : उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांमध्ये जनसंवाद यात्रा करत आहेत. त्या अनुषंगाने धाराशिव लोकसभा मतदारसंघातील जनसंवाद यात्रा लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघापासून सुरुवात केली जाणार आहे. दिनांक सात मार्च रोजी दुपारी बारा वाजता संभाजीनगर येथून लातूर विमानतळावर त्यांचे आगमन होणार आहे. दुपारी साडेबारा वाजता औसा येथे विजय मंगल कार्यालयात सभा घेण्यात येणार आहे या सभेनंतर औसा विधानसभा मतदारसंघातील लामजना किल्लारी कासार सिरसी सहपुढे ते उमरगा विधानसभा मतदारसंघातील नारंगवाडी पाटी, नाईचाकूर , मुळज मार्गे उमरगा जाणार आहेत. दि. 07 मार्च रोजी सायं. 4 वाजता उमरगा येथे कै. शिवाजी दादा मोरे क्रीडा संकुल, छत्रपती शिवाजी कॉलेज येथे सभा होणार आहे. यानंतर तुळजापूर येथे संध्याकाळी 7 वाजता डॉ आंबेडकर चौक, तुळजापुर येथे सभा होणार आहे त्यानंतर तुळजापुरची सभा संपल्यानंतर पुष्पक मंगल पार्क, धाराशिव येथे मुक्काम राहणार आहेत.
