व्हाईस ऑफ मीडियाच्या जिल्हा आरोग्य समन्वयक पदी गणेश मुंडे

0
व्हाईस ऑफ मीडियाच्या जिल्हा आरोग्य समन्वयक पदी गणेश मुंडे

व्हाईस ऑफ मीडियाच्या जिल्हा आरोग्य समन्वयक पदी गणेश मुंडे

उदगीर (एल.पी.उगीले) : गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारितेच्या माध्यमातून जनसामान्याच्या प्रश्नांना वाचा फोडणारे व आपल्या सामाजिक कार्यातून अनेकांना वैद्यकीय शासकीय कामाच्या माध्यमातून मदत करणारे युवा पत्रकार गणेश मुंडे यांची ओळख आहे. अनेक नामांकित वर्तमानपत्रांमध्ये प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केले आहे. हे काम करत असताना अधिकारी व नागरिक यांच्यामध्ये समन्वय साधून अनेक प्रश्नाला न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले आहे.अशा धडपड करणाऱ्या व सर्वांशी संपर्क असलेल्या युवा पत्रकाराच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा सर्व पत्रकार बांधवांपर्यंत पोहोचावी, यासाठी व्हाईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी लातूर येथे झालेल्या वैद्यकीय शिबिरामध्ये विधान परिषदेचेआमदार रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.हे नियुक्तीपत्र व्हाईस ऑफ मीडिया आणि एम.आय.एम.एस.आर. व यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत लातूर जिल्ह्यातील पत्रकारांच्या महाआरोग्य शिबीर व आयुष्यमान भारत आरोग्य कार्डचे वितरण या कार्यक्रमात देण्यात आले.या कार्यक्रमाचे उद्घाटक आ. रमेशअप्पा कराड तर प्रमुख प्रमुख पाहुणे डॉ.एन.पी.जमादार अधिष्ठाता, यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय लातूर,संदीप काळे संस्थापक अध्यक्ष व्हाईस ऑफ मीडिया,दिव्या भोसले राष्ट्रीय महासचिव,विजय चोरडिया मराठवाडा अध्यक्ष,बालाजी फड, मराठवाडा संपर्क प्रमुख,संगम कोटलवार जिल्हाध्यक्ष,निशांत भद्रेश्वर अध्यक्ष इलेक्ट्रॉनिक्स विंग विष्णु अष्टेकर, डॉ.सितम सोनवणे यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमास लातूर जिल्ह्यातील तालुका अध्यक्ष प्रभाकर शिरूरे, (लातूर), रविकांत क्षेत्रपाळे, (अहमदपूर), विठ्ठल कटके, (रेणापूर), विनोद निला, (चाकुर), परमेश्वर शिंदे, (निलंगा), विजया बिराजदार (औसा), प्रा. रेवण मळभागे, (देवणी), अॅड.अमोल कळसे (जळकोट) यांच्यासह अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *