‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’
अहमदपूर (गोविंद काळे) : तहसील कार्यालय अहमदपूरच्या वतीने दि.6 मार्च रोजी सकाळी 9 वा.यशवंत विद्यालय अहमदपूर येथून मतदार रॅलीला हिरवी झेंडा दाखवून अहमदपूरचे तहसीलदार शिवाजी पालेपाड, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे,केंद्रप्रमुख नंदकुमार कोनाले यांनी जनजागृती रँलीची सुरुवात केली.
यावेळी यशवंत विद्यालयाचे मुख्याध्यापक गजानन शिंदे यांनी सहभागी विमलाबाई देशमुख कन्या शाळा,रविद्रनाथ टागोर विद्यालय,नुतन मराठी विद्यालय,मौलाना आझाद उर्दू शाळाव यशवंत विद्यालय येथिल शेकडो विद्यार्थी व शिक्षक बांधवांचे ,तहसील कार्यालयातील कर्मचारी बांधवांचे,
उपस्थितीत सर्व मान्यवरांचे विद्यालयाच्या वतीने गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
उपविभागीय अधिकारी प्रविण फुलारी, तहसीलदार शिवाजी पालेपाड नायब तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाने
जिल्हयातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी व पारदर्शक निवडणूक होण्याकरीता मतदारांना स्वीप कार्यक्रमांतर्गत जनजागृती करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वीपचे सदस्य महादेव खळुरे,शिवकुमार गुळवे,मोहन तेलंग,बस्वेश्वर थोटे,चंद्रकांत पेड,पुरुषोत्तम काळे,श्रीमती अर्चना माने,नागनाथ स्वामी,कपिल बिरादार,प्रा.शिवशंकर पाटील यांचे सहकार्य लाभले.
जनजागृती रँली शहरातील महात्मा बस्वेश्वर चौक,छ.शिवाजी महाराज चौक,आझाद चौक,हणुमान मंदिर,बाबासाहेब आंबेडकर चौक,सावरकर चौकातून
‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’…..
मतदानासाठी वेळ काढा , आपली जबाबदारी पार पाडा….
ना जातीवर ना धर्मावर ,बटन दाबा कार्यावर….
आधी मतदानाचे नंदनवन ,नंतर सेवेचे आनंदवन….
चला मतदान करू या , देशाची प्रगती घडवू या…. चला मतदान करू या , देशात लोकशाही रुजवू या….असे मोठ्या आवाजाने घोषणा देत तहसील कार्यालयात रँलीचे सांगता करण्यात आले.उपस्थितीत शिक्षक व विद्यार्थ्यांचे तहसीलच्या वतीने गुलाब पुष्प देवून तहसीलदार साहेबांनी स्वागत केले.तालुक्यातील विविध गावात स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृती करण्यात येणार आहे.मतदानाचा हक्क बजावा तसेच मतदानासाठी दिलेली सुट्टी साजरी न करता त्याचा मतदानासाठी उपयोग करा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
तहसील कार्यालयातर्फे आयोजित या मतदान रॅलीला उत्फूर्त प्रतिसाद मिळाला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नायब तहसीलदार मुनवर मुजावर सहायक प्रल्हाद रिठे,नोडल अधिकारी बबनराव ढोकाडे,केंद्रप्रमुख नंदकुमार कोनाले,हरिषचंद्र शेकडे,गौरव चवंडा,विवेकानंद हुडे,आदिने परिश्रम घेतले.