बहुचर्चित अहमदपूरच्या मुख्याधिकारी पदी आय. ए.एस अधिकारी नमन गोयल यांची नियुक्ती

0
बहुचर्चित अहमदपूरच्या मुख्याधिकारी पदी आय. ए.एस अधिकारी नमन गोयल यांची नियुक्ती

बहुचर्चित अहमदपूरच्या मुख्याधिकारी पदी आय. ए.एस अधिकारी नमन गोयल यांची नियुक्ती

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील नगरपालीकेचे बहुचर्चित मुख्याधिकारी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईमुळे रिक्त असलेल्या मुख्याधिकारी पदावर
आय.ए.एस दर्जा असलेले प्रशिक्षणार्थी अधिकारी नमन गोयल यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली असून दि 6 मार्च रोजी त्यांनी पदभार स्विकारला आहे.
याविषयी सविस्तर माहीती अशी, की काही दिवसा पूर्वी अहमदपूर नगरपालीकेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून 5 लाखाची लाच घेताना रंगेहात पकडले होते तेव्हापासुन नगरपालीकेचा अतिरिक्त कार्यभार चाकुर नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांच्याकडे होता परंतु अहमदपूरची नगरपालीका ‘ ब ‘ दर्जाची असल्यामुळे आय.ए.एस दर्जा असलेले प्रशिक्षणार्थी अधिकारी नमन गोयल यांची नगरपालीकेच्या मुख्याधिकारी पदी प्रशासनाकडून नियुक्ती करण्यात आली असुन दि 6 मार्च रोजी पदभार स्विकारला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे त्यांनी यापुर्वीही काही महीने तहसीलदार पदाचा प्रशिक्षणार्थी म्हणुन कार्यभार पाहीला असल्यामुळे शहरवासीयांना त्यांचा परिचय आहे
अहमदपूर शहराचा पाणीप्रश्न, कचरा व्यवस्थापन , स्वच्छता, कार्यालयीन कामकाज, कर्मचाऱ्यांवर वचक, पालीकेमध्ये काम घेऊन येणारे नागरीकांचे प्रश्न सोडवण्याची कार्यशैलीमुळे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे जनतेमध्ये प्रचंड लोकप्रिय होते यामुळे नवनियुक्त आय.ए.एस दर्जा असलेले प्रशिक्षणार्थी अधिकारी नमन गोयल यांच्याकडून अहमदपूर वासीयांना खुप मोठया अपेक्षा आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *