सादतखान पठाण यांचे दुःखद निधन
अहमदपूर : दि.07.04.24 येथील शेतकरी सादत खान पठाण यांचे यांचे दि. सहा रोजी संध्याकाळी सहा च्या दरम्यान वयाच्या 75 व्या वर्षी राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी दि. सात रोजी गुरुवारी दुपारी बारा वाजता अहमदपूर येथील बडे गुलिस्तान स्मशान भूमीमध्ये अत्यंत शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सहा मुली, नातवंडे परतवंडे असा मोठा परिवार असून सामाजिक कार्यकर्ते अमजद पठाण यांचे ते वडील होत. सादतखान पठाण हे मितभाशी, मनमिळावू, अल्पभूधारक शेतकरी, पशुपालक म्हणून परिसरात ओळख होती. त्यांनी पंधरा वर्षांपूर्वी वाकी नदीच्या पुलावरून वाहून जाणाऱ्या एस टी तील प्रवाशांना स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचविले होते म्हणून एस टी महामंडळाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आलेला होता. त्यांच्या दुःखद निधनाबद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.