शिक्षणाबरोबर संस्कारी पिढी घडवण्याचे काम आम्ही करतो – गणेश हाके
अहमदपूर (गोविंद काळे) : आमची शाळा ही ग्रामीण भागात आहे. येथील विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्यासाठी व त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून आम्ही या शाळेची स्थापना जाणीवपूर्व ग्रामीण भागामध्ये केलेली आहे. या शाळे मार्फत विद्यार्थ्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार प्रवेश देण्याचे काम केले जाते ज्या विद्यार्थ्यांची परिस्थिती बेताची असेल अशा विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश आम्ही देतो. आमच्या शाळेमध्ये शिक्षणाबरोबर सामाजिक, राजकीय, धार्मिक तसेच दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या सर्व गोष्टी आम्ही शिकवतो व शिक्षणाबरोबर संस्कारी पिढी घडवण्याचे काम आम्ही करतो असे मत सम्राट चंद्रगुप्त मोर्ये इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने संस्कृती गार्डन अहमदपूर येथे आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात संस्थाध्यक्ष तथा भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री बाळासाहेब जाधव,
संस्था सचिव रेखाताई हाके, संस्थेच्या उपाध्यक्ष मानसी हाके, संचालक कुलदीप हाके, संचालिका शिवालिकाताई हाके, ज्ञानोबा बडगिरे, सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, राजकुमार मजगे, सुशांत गुनाले, डॉ अमृत चिवडे, डॉ. अतुल खडके, हनुमंत देवकते, गजानन चंदेवाड, माणिक नरवटे आदी उपस्थित होते.
दिनांक 05/03/2024 रोजी सम्राट चंद्रगुप्त मोर्ये इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपल्या अंगी असलेल्या विविध कला सादर केल्या. विद्यार्थ्यांनी मनमोहक नृत्य यावेळी सादर केली . या बाल कलाकारांच्या कलेमुळे उपस्थित प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फिटले. उपस्थित प्रेक्षकांकडून बालकांचे तोंडभरून कौतुक करण्यात आले. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांकडून शाळेचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हिना कल्लूरकर, जोशना स्वामी, स्नेहा ओझा, आसमा शेख, रेणुका सूर्यवंशी, मारिया सिंग,प्रणिता हाजोग, शमिता नाईक, सुजी फर्नांडिस, आनंद कांबळे, हनुमान राऊत, इंद्रजीत दमामे, गणेश कोईलवाड, छायाकृष्ण राभा, इरशाद अहमद, गणेश पांचाळ, ओझा जगदीश, पांचाळ राजश्री, चंद्रकला काडवदे,सुभद्रा महाजन, नवनाथ सुरनर, ज्ञानोबा उपवाड आदींनी परिश्रम घेतले.