डॉ. राधाकृष्णन विद्यालयातील बालकलाकारांनी जिंकली उपस्थितांची मने
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील डॉ. राधाकृष्णन प्राथमिक विद्यालय, व डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासी विद्यालय, निडेबन यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांनी लोकगीते, भारुड, लावणी, देशभक्तीपर गीत इत्यादी गीतांवर नृत्याचे सादरीकरण केले, तसेच मोबाईलचे दुष्परिणाम या विषयावर नाटिकेचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक विश्वनाथराव मुडपे गुरुजी हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन निडेबन ग्रामपंचायतचे माजी सरपंच सुनील सोमवंशी यांनी केले. कार्यक्रमासाठी केंद्रप्रमुख बालाजी धमनसुरे, दशरथराव शिंदे, पुष्पाताई शिंदे, विश्वनाथराव बिरादार माळेवाडीकर,रमाकांतराव बनशेळकेकर, सूर्यकांतराव पांचाळ, नवनाथराव पाटील, संस्था सचिव देविदासराव नादरगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुलता बोडके व रोहित बिराजदार यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मु. अ. ज्ञानोबा कुंडगिरे, उमेश नादरगे, शरदचंद्र पांचाळ, शशिकुमार पाटील, प्रशांत पांचाळ, गोविंद रावळे, विठ्ठल नादरगे, मल्लिकार्जुन कलबुर्गे, विजयकुमार पवार, अमोल कांबळे, लक्ष्मण गायकवाड, वर्षाताई पाटील, मनोरमा तेलंगे, आम्रपाली सोमवंशी, सुनीता शिंदे, प्रांजली नादरगे यांनी परिश्रम घेतले.