कै. रसिका महाविद्यालयात वित्तीय साक्षरता कार्यशाळा संपन्न
देवणी (प्रतिनिधी) : कै. रसिका महाविद्यालय देवणी येथे वाणिज्य विभागाअंतर्गत NCFE संस्थेच्या वतीने दिनांक ०५ मार्च २०२४ रोजी सकाळी ११:३० ते दु. १:३० या वेळी मा. प्रदीप गुडसुरकर यांचे वित्तीय साक्षरता या विषयावरती मार्गदर्शन संपन्न झाले. यावेळी त्यांनी भारतीय भांडवल बाजाराचे स्वरूप, DMAT खाते कसे काढावे व त्याचे प्रचलन कसे करावे याची माहिती यावेळी विद्यार्थ्यांना दिली. वित्तीय गुंतवणुकीचे महत्त्व व विविध क्षेत्रात गुंतवणूक कशी केली जाते आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून आपली होणारी फसवणूक कशी थांबवता येईल याचे विस्तृत विविध उदाहरणासह विवेचन त्यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत जावळे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अंकुश भुसावळे यांनी केले. सूत्रसंचालन कु. ऐश्वर्या नागुरे यांनी केले. आभार प्रदर्शन कु. आरती भोसले यांनी केले. हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. गोपाल सोमाणी, डॉ. सुलोचना डेंगाळे, सौ. ज्योती गुडसुरकर, प्रा. भोसले यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.