स्व.खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते नऊ रोजी उदघाटन

0
स्व.खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते नऊ रोजी उदघाटन

स्व.खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते नऊ रोजी उदघाटन

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी ऐतिहासिक उदगीर शहर सज्ज

उदगीर (एल.पी.उगीले) : क्रीडा व युवक कल्याण सेवा संचालनालय आयोजित स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी ऐतिहासिक उदगीर शहर सज्ज झाले आहे. क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते स्पर्धेचे भव्य उद्धाटन सोहळा 9 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता आहे. यावेळी प्रख्यात अभिनेत्री शेफाली जरीवाला यांचे नृत्य अविष्कारासह लेझर शो व नयनरम्य आतिषबाजी करण्यात येणार आहे.स्पर्धेचे भव्य उद्घाटन व राज्यातील अव्वल कुस्तीगीरांचा खेळ पहाण्यासाठी शहरात उत्सुकता दिसून येत आहे. उदगीर मधील जिल्हा परिषद मैदानावर या स्पर्धेची जय्यत तयारी सुरू झाली आहे. क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी दुरदृष्य प्रणालीव्दारे तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर तयारीची पहाणी उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, उपसंचालक संंजय सबनीस, उपसंचालक युवराज नाईक, माजी उपसभापती बाळासाहेब मरालापल्ले, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केली.
9 ते 11 मार्चपर्यंत कुस्तीप्रेमींसाठी 3 दिवस पर्वणी ठरणार्‍या स्पर्धेत 10 जिल्ह्यातील 36 खेळाडु असे एकुण 360 खेळाडु उदगीर शहरात दाखल झाले आहेत.लातूर जिल्हयातील उदगीर शहरात प्रथमच होणार्‍या स्पर्धेत राज्यातील 360 खेळाडू सहभागी होणार आहेत. यासाठी महाराष्ट्रातील खेळाडू, पंच व पदधकिर्‍यांचे आगमन उदगीर शहरात होत आहे. फ्रीस्टाईल, ग्रीको रोमन व महिलांचे संघ मैदानात उतरणार आहे. स्पर्धेतील सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक विजेत्यांना अनुक्रमे 60 हजार, 50 हजार व 30 हजार रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत.
स्पर्धेचे उघाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी लातूर जिल्हयाचे पालकमंत्री तथा ग्रामविकास व पंचायत राज व पर्यटन मंत्री गिरीष महाजन हे उपस्थित राहणार आहेत. तर उद्धाटक म्हणून राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून खा.रामदास तडस, खा.सुधाकर श्रृंगारे, खा.ओमप्रकाश निंबाळकर, आ.विक्रम काळे, आ.सतिश चव्हाण, आ.सुरेश धस, आ.रमेश कराड, आ.अमित देशमुख, आ.संभाजी पाटील निलंगेकर, आ.बाबासाहेब पाटील, आ.धिरज देशमुख, आ.अभिमन्यु पवार, अप्पर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, आयुक्त क्रीडा व युवक सेवा डॉ.राजेश देशमुख, लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर- घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, पोलीस अधिक्षक सोमय मुंडे, लातूरचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे, अर्जुन पुरस्कारार्थी काकासाहेब पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन उपसंचालक युवराज नाईक, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सचिव पै.योगेश दोडके, उपसंचालक जगन्नाथ लकडे, लातूर जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव शिवरुद्र पाटील यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *