महाशिवरात्रीनिमित्त श्री महेश मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील शेकडो वर्ष जुने श्री महेश मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी पहाटेपासूनच गर्दी केली असून मंदिर परिसरात भजन कीर्तन हे केले जात आहे. शिरूर ताजबंद येथील श्री महेश देवस्थान हे पंचक्रोशीत प्रसिद्ध असून शेकडो वर्षापासून या ठिकाणी भाविक दर्शनासाठी येतात .खास करून महाशिवरात्रीला व श्रावण महिन्यात या ठिकाणी दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करतात.
श्री महेशाची सुंदर व कोरीव असे शिवलिंग व त्यासमोर असलेला पाषाणा पासून बनवलेला नंदी हे या ठिकाणी भाविकांचे आकर्षण आहे. श्री महेश शिवलिंगावर भाविक दूध ,दही ,पंचामृत याचा अभिषेक करून शिवरात्री निमित्त बेलपत्री व पळसाचे फुले वाहून पूजा करतात. श्री महेश मंदिर हे तालुक्यातील खूप जुने मंदिर असून या ठिकाणी अत्यंत भक्ती भावाने नागरिक दर्शनासाठी येतात नतमस्तक होतात आणि आपल्या मनातल्या भावना व्यक्त करत देवाचे दर्शन घेतात. आज महाशिवरात्री निमित्त या ठिकाणी खास भाविकांसाठी स्थानिकाकडून उसाच्या रसाचे वाटप व फळाचे वाटप केले जात आहे. हर हर महादेवाच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला आहे. तालुक्यात इतर ठिकाणी तीर्थ धानोरा येथेही महादेवाचे खूप जुने आणि प्रसिद्ध मंदिर आहे याशिवाय चिलका येतील घड्याळ नदीपात्रात ही महादेवाचे मंदिर आहे व असरणी येथील महादेव मंदिर बेलजाळी येथील महादेव मंदिर ही प्रसिद्ध आहेत . या ठिकाणीही लोकांनी दर्शनासाठी खूप मोठी गर्दी केलेली आहे एकंदरीतच आज दिवस हा उपवासाचा, पूजा , साधना करण्याचा आहे यामुळे भाविक या ठिकाणी दर्शन घेऊन पूजा पाठ करत भजन कीर्तन करत हर हर महादेवाच्या नामाचा गजर करत दर्शन घेताना दिसत आहेत एकंदरीतच महाशिवरात्रीनिमित्त सर्वत्र पवित्र श्रद्धा व भक्ती भावाचे वातावरण दिसत आहे.