सीमाभागामध्ये ग्राहक दिन मोठ्या उत्साहात संपन्न
कमालनगर (एल.पी.उगीले) : सीमा भागांमधील कमालनगर तालुक्यातील दापका चवर या ठिकाणी सरकारी माध्यमिक विद्यालय दापका येथे जागतिक ग्राहक दिन मोठ्या उत्साहात घेण्यात आला. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक भानुदास वासरे हे होते तर मुख्य मार्गदर्शक म्हणून शालेय समितीचे अध्यक्ष अंकुश लक्ष्मणराव वाडीकर,तर प्रमुख अतिथी रामविलास नावंदर, बालाजी घरडे, विलास भाऊराव जाधव,भूमिका बँकेचे संचालक औराद सतीश सावळे ,शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य संजीव पोतले, सत्यवान जाधव हे मान्यवर उपस्थित होते.
शाळेमध्ये ग्राहक दिन भाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा, घेण्यात आलेले होत्या .त्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. प्रस्तावित भाषण सौ अर्चना शिंदे यांनी केले, त्यांनी ग्राहक दिनाची सुरुवात केव्हा व कुठे झाली? ग्राहक आणि विक्रेता यामध्ये संबंध कसे असावे? असे मार्गदर्शन केले. विक्रेता आणि ग्राहकाची व्याख्या आपण समजून घेतली पाहिजे, त्यासाठी त्यांनी उदाहरण देऊन सांगितले. ज्ञान घेत असताना चौकसवृत्ती, मनमिळाऊ स्वभावातून ज्ञानार्जन केले पाहिजे. शिक्षक अध्यापन करत असताना विद्यार्थ्यांच्या अध्ययनाकडं लक्ष देऊन अध्यापन केल पाहिजे. विद्यार्थ्यांनी अभ्यास करून मार्क मिळवावे. असे ग्राहक दिनानिमित्त आवाहन केले. ध्येयवेडे लोक इतिहास घडवतात. उदाहरणार्थ समाजसुधारक “अंकुश वाडीकर” यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण समाजाचे देणे लागतो अशा भावनेतून अंकुश वाडीकर कार्य करत आहेत, सामाजिक कार्यामध्ये अंकुश वाडेकर यांच्या सोबत सर्वांनी सहभाग घेतला पाहिजे. आजचा विध्यार्थी उद्याचा नागरिक आहे. तो राजकारणात सुद्धा आला पाहिजे, आणि राजकारणातील घाण बाहेर काढण्याचे काम केलं पाहिजे. तरच आमच्या भागाचा विकास होऊ शकतो. तरच आम्ही ग्राहक दिन साजरा केला, असे आम्हाला म्हणता येईल. विविध उदाहरण देऊन विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शैक्षणिक जागरूकता निर्माण केली. त्यानंतर विलास गुरुजी यांनी शाळेसाठी आम्ही सतत वेळोवेळी मार्गदर्शन करत असतो. शाळेत विविध उपक्रम राबवत असताना जेव्हा जेव्हा आमची गरज पडेल तेव्हा आम्ही शाळेतील शिक्षकांना सहकार्य करतो. शैक्षणिक विकास करायचा असेल तर युवा पिढीने समाजभिमुख बनले पाहिजे. समाज परिवर्तन करून शैक्षणिक,सामाजीक, आर्थिक इ.प्रगती करता येते. भानुदास वासरे यांनी मार्गदर्शन करताना स्पष्ट केले की, ग्राहक दिनानिमित्त भेसळ कशा पद्धतीने होते आणि ती कशी ओळखावी? कशा पद्धतीने भेसळ बाजूला केली पाहिजे. तशा पद्धतीने समाजात काही भेसळयुक्त विकृत विचार करणारे काही लोक समाजात आहेत,त्याला बाजूला काढण्याचे काम आमचे विद्यार्थी करतील, असे सांगितले. या वेळी पंढरीभोसले, वसंत विलासपुरे, चेन्नईबसवा स्वामी, सूत्रसंचालन संजीवकुमार बिरादार,तर आभार प्रदर्शन नवनाथ गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.