वलांडी येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा
देवणी (लक्ष्मण रणदिवे) : तालुक्यातील तिरुपती कॅम्पुटर सेंटर वलांडी व महिला बालविकास विभाग महाराष्ट्र शासन व ज्ञानेश्वर सेवाभावी संस्था शेपेवाडी तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन आधार केंद्र वलांडी यांच्या वतीने जागतिक महिला दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बालसंगोपन आधार केंद्र चे व बाल हक्क संरक्षण समिती सदस्य वरूनराज सूर्यवंशी, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे माणिकराव डोके पोलीस निरीक्षक देवणी यांनी विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनीना सखोल असे मार्गदर्शन केले. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ राणीताई रामभाऊ भंडारे यांनी अध्यक्षीय समारोपाचे भाषण केले, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदनी राजकुमार माने यांनी केले, तर आभार प्रदर्शन ऋतुजा रतन गिरी यांनी केले. काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यात कार्तिक स्वामी बोंबळीकर, भोसले गायत्री, श्वेता फुलारी, अभिषेक पांडे इत्यादींनी आपली मनोगत व्यक्त केले. यावेळी तिरुपती कॅम्पुटर सेंटरचे संचालक नियाज, मानुला, अमोल जाधव व तिरुपती कॅम्पुटर येथील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सेंटर येथील सर्व कर्मचाऱ्यानी परिश्रम घेतले.