गुंफावाडी येथील सरपंच, उपसरपंच यांच्यासह अनेकांचा भाजपात जाहीर प्रवेश
गुंफावाडी येथील सरपंच, उपसरपंच यांच्यासह अनेकांचा भाजपात जाहीर प्रवेश
लातूर (एल.पी.उगीले) : भारतीय जनता पार्टीचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या माध्यमातून होत असलेल्या विविध विकास कामाने प्रेरित होऊन लातूर तालुक्यातील मुरुड शहरालगत असलेल्या मौजे गुंफावाडी येथील सरपंच, उपसरपंच यांच्यासह अनेकांनी लातूर येथील भाजपाच्या संवाद कार्यालयात आ. रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टी जाहीर प्रवेश केला.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील गावागावात, वाडी वस्तीत भाजपा नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या माध्यमातून विकासाची कामे मोठ्या प्रमाणात होत आहेत. मुरुड शहरासह परिसरातील अनेक गावात विकासाच्या विविध योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. आ कराड यांच्या माध्यमातून होत असलेल्या कामांने प्रेरित होऊन मुरुड शहरा जवळ असलेल्या मौजे गुंफावाडी येथील सरपंच सिंधुताई पिंपरे, उपसरपंच विष्णू बबन महानवर, ग्रामपंचायत सदस्य संगीता गाडे, गोरोबा नामदेव मगर, सोसायटीचे संचालक सुनील सुरेश जाधव, सुनील गाडे, सिताराम पिंपरे यांच्यासह अनेकांनी आ. रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लातूर येथील भाजपाच्या संवाद कार्यालयात भारतीय जनता पार्टी जाहीर प्रवेश केला.
यावेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव भागवत सोट, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत बापू नागटिळक, लातूर तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष वैभव सापसोड, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष लताताई भोसले, वैजनाथ हराळे यांच्यासह रमाकांत गायकवाड, अर्जुन पवार, वैजनाथ गाडे, भालचंद्र लांडगे, काकासाहेब पिंपरे, बिरू वगरे व इतर अनेक जण उपस्थित होते.
