अध्यात्मिक विद्यालयाच्या जागेवरुन महिलांना मारहाण, निलंग्यात चौघांविरोधात गुन्हा

0
अध्यात्मिक विद्यालयाच्या जागेवरुन महिलांना मारहाण, निलंग्यात चौघांविरोधात गुन्हा

अध्यात्मिक विद्यालयाच्या जागेवरुन महिलांना मारहाण, निलंग्यात चौघांविरोधात गुन्हा

निलंगा (प्रतिनिधी) : दान म्हणून दिलेली आध्यात्मिक विश्व विद्यालयाची जागा आमच्या नावावर आहे, असे म्हणत येथे आध्यात्माचे काम करणाऱ्या शिक्षिकांना मारहाण करून बाहेर काढल्याप्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात चौघांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
या संदर्भात हाती आलेली माहिती अशी की,सन २००६ मध्ये येथील कल्लपा यशवंतअप्पा बिराजदार यांनी लोंढे नगरमध्ये गुरु विरेंद्र देव सोहमलाल दिक्षित यांना दानपत्र करून दिलेल्या जागेत आध्यात्मिक विश्व विद्यालय चालू करण्यात आले. मात्र मागील काही दिवसापासून मुळ मालक कल्लपा बिराजदार व त्यांचा मुलगा सुरेश यांनी सदरील जागा आमच्या मालकीची आहे.असे म्हणत वाद करण्यास सुरवावत केली, व जागा खाली करा असे म्हणत दमदाटी करीत असत. दरम्यान, हे प्रकरण निलंगा कोर्टात न्यायप्रविष्ट असताना ३ मार्च रोजी दुपारी तीन वाजता विश्व विद्यालयात फिर्यादी नागरत्न बागली यांच्यासह प्रीती रामधिकार राजपूत, अनिता प्रदिप जोशी, अमोल दिपक सोनटक्के, सुनैना रामपालसिंग सोनकर, स्वाती गोविंद हंचाटे, मुक्ता शंकर येमते, शोभा राजाभाऊ भागवत या विश्व विद्यालयात शिकवीत असताना काशीबाई बिराजदार (चिंचोलिकर) आरती बिराजदार, सुरेश बिराजदार, दास व त्यांच्यासोबत इतर चार ते पाच जणांनी तुम्ही आमची जागा खाली करा म्हणत हाताला धरुन बाहेर ढकलले. एवढेच नाही तर सुरेश बिराजदार यांनी शिवीगाळ केली. तर इतर सहा जणांनी लाथा बुक्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. यामध्ये फिर्यादी व स्वाती हंचाटे, अनिता जोशी याचा मोबाइल फुटुन अंदाजे २५ हजार रुपयाचे नुकसान झाले. व इतर दोघींचे मोबाईल गहाळ झाले असून मौल्यवान वस्तूंची नासधूस करण्यात आली.
नागरत्न बागली यांच्या फिर्यादीवरून निलंगा पोलीस ठाण्यात काशीबाई बिराजदार (चिंचोलिकर) आरती बिराजदार, सुरेश बिराजदार, दास व त्यांचे सोबत इतर चार ते पाचजण तसेच नातेवाइकांवर गु.र.न .79/ 24 कलम 452 354 143 149 427 323 506 294 504 भारतीय दंड विधान संहितेसह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 एक 37 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल वासुदेव हे करीत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *