देवणी तालुक्यातील गुरधाळ खरबवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताहात भगर खाल्ल्याने 30 ते 35 जनांना विषबाधा
देवणी (लक्ष्मण रणदिवे) : तालुक्यातील मौजे गुरधाळ खरबवाडी येथील हरिनाम सप्ताह दि 5 मार्च 2024 पासून चालू असून या सप्ताहाच्या कार्यक्रमात महिला व पुरुष दिनांक 07 मार्च 2024 रोजी पंधरवडी एकादशी निमित्त हरनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात भगर खाल्ल्याने जवळपास 40 लोकांना विषबाधा झाली. त्यापैकी काही जणनी रुग्णालयात उपचार घेणे योग्य समजले.तात्काळ देवणी ग्रामीण रुग्णालय येथे 25 ते 30 लोकांवर उपचार चालू आहे. या 30 ते 35 विषबाधा झालेल्या लोकावार देवणी ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी डॉ तांबोळी व सिस्टर संभाळे उपचार करत आहेत. विषबाधा झालेल्यांचे नावे गायकवाड हुसेन, लोचना गायकवाड,ज्ञानोबा गायकवाड, पार्वती बाई कांबळे,भानुबाई कांबळे, कांचन गायकवाड,सुवर्णा गायकवाड, उज्वला गायकवाड,चंद्रकला गायकवाड,अर्चना गायकवाड,सुवर्णा नरसिंग गायकवाड,वनिता गायकवाड, लक्ष्मीबाई गायकवाड,केराबाई गायकवाड,ज्योतिबा गायकवाड,बळवंत गायकवाड,श्रीनिवास गायकवाड,सविता कांबळे,सगुनाबाई वाघमारे,कालींदाबाई कांबळे,लक्ष्मीबाई सुवर्णकार,शकुंतला कारागीर इत्यादी जनावर देवणी ग्रामीण रुग्णालय येथे उपचार चालू आहे. उपचार घेत असलेल्या लोकांची प्रकृती ठीक असल्याचे वैद्यकीय सूत्राकडून सांगण्यात येत आहे डॉ.तांबोळी व ग्रामीण रुग्णालयातील सर्व कर्मचारी विषबाधा झालेल्या लोकांवर अतिदक्षतेने लक्ष देत आहेत.