आशा कार्यकर्तीने काम उत्स्फूर्तपणे करावे — संगीता डावरी
देवणी (लक्ष्मण रणदिवे) : देवणी शहरात तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात शनिवारी आशा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ.स्वाती सोनवणे कार्यक्रमाचे अध्यक्ष तर प्रमुख पाहुणे डीसीएम संगीता डावरी, वैद्यकीय अधीक्षक निळकंठ सगर कालिदास बिरादार, अंथनी,प्रथम टी एच ओ स्वाती सोनवणे यांनी आशा दिवसाबद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच आशा दिवस बद्दल आशाना मार्गदर्शन केले. संगीता डावरी यांनी आशा डे म्हणजे काय, आशा वर्कर ने समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचे काम करतात, आज आशाला कमी मानधन असेल परंतु भविष्यात मानधन तत्वावर न होता त्यांच्या कामावर वेतन देण्याचा प्रयत्न करू. आशाने सामाजिक बांधिलकी म्हणून आरोग्याचे काम करावे. शासनाने ठरवून दिलेले उद्दिष्ट वेळेत पार पाडावे, तसेच महिला दिनाचेही सर्व आशा कार्यकर्तीना शुभेच्छा दिल्या.समाजातील महिलांचे स्थान, बदलत्या काळानुसार स्वतः मध्ये बदल करून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर, स्वतः साठी थोडासा वेळ आदींबाबत मार्गदर्शन केले. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उत्कृष्ट आशा स्वयंसेविका, तसेच रांगोळी, संगीत खुर्ची, वक्तृत्व स्पर्धामध्ये प्रथम, दिव्तीय, क्रंमाक मिळविलेल्या आशांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीफ कोनाळे ए, डी,यांनी केले.