महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून वर्धापनदिनानिमित्त महिला डॉक्टर व परीचारकांचा सत्कार
लातूर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आठराव्या वर्धापन दिनानिमित्त व महिला दिनानिमित्त मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांच्या हस्ते उपजिल्हारुग्णालय निलंगा येथील महिला डॉक्टर तसेच परिसेविका, परिचारिका, कक्षसेविका व महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.या वेळी वैद्यकीय अधिकारी दिनकर पाटील उपस्थित होते.या प्रसंगी डॉ भिकाणे यांनी नेहमीच रुग्णांची सेवासुश्रूषा करण्यामध्ये महिला कर्मचारी अग्रेसर असतात, असे सांगत त्यांनी तालुक्यातील रुग्णांना यापुढेही न्याय द्यावा, यासाठी व त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी मनसे वर्धापनदिन व महिला दिनाचे औचित्य साधत उपजिल्हारुग्णालयात आल्याचे सांगितले.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ रोहिणी पौळकर,परिसेविका सरस्वती निरुडे,बिट्टे संगीता,कदम सिस्टर व महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी तालुकाध्यक्ष सूरज पटेल,शिरूर अनंतपाळ तालुकाध्यक्ष संभाजी सुरवसे,जिल्हाउपाध्यक्ष कामगार सेना गहिनीनाथ सोमवंशी, तालुकाउपाध्यक्ष प्रदीप माने, अविनाश पाटील, निलेश राघो, बबन बोरसुरे, अजय गुत्ते, दत्ता कांबळे, संतोष कांबळे, सलीम शेख,बबलू शेख आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.