राज्य शासनाने थांबवलेले मुस्लिम आरक्षण रिस्टोर करण्याचा कॅबिनेटमध्ये मुद्दा मांडा !
काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष भा. ई. नगराळे यांची मंत्री संजय बनसोडे यांच्याकडे मागणी []
उदगीर प्रतिनिधी : दिनांक २५ जून २०१४ मध्ये तत्कालीन आघाडी सरकारने कॅबिनेटमध्ये मुस्लिम समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर ९ जुलै २०१४ रोजी अध्यादेश काढून मुस्लिम आरक्षणाचा कायदा करण्यात आला. १९ जुलै रोजी शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. मात्र राज्य सरकारने मुस्लिम आरक्षण थांबविलेले आहे. राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी मुस्लिम समाजाला मागच्या सरकारने दिलेले ५ टक्के आरक्षण देण्यासाठी कॅबिनेटमध्ये मुस्लिम आरक्षण रिस्टोर करण्यासाठी मुद्दा मांडावा अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष भा. ई. नगराळे यांनी मंत्री संजय बनसोडे यांच्याकडे केली आहे.
रविवारी ( दि. १० ) येथील रघुकुल मंगल कार्यालयात नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी , मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती व भारतीय दलित पॅंथर यांच्या संयुक्त विद्यमाने मुस्लिम आरक्षण समीक्षा बैठक व पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी सनदी अधिकारीतथा माजी सनदी अधिकारी भा. ई. नगराळे बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी भारतीय दलित पॅंथरचे लक्ष्मण भुतकर होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे , काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष भा. ई. नगराळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर बसवराज पाटील नागराळकर , प्रा. शिवाजी मुळे , समीर शेख , मोईज शेख , आयोजक निवृत्ती सांगवे , लक्ष्मण कांबळे , मोहसीन खान , मंजूर पठाण , मधुकर एकुर्केकर , आजिम दायमी , अब्दुल समद बागवान , अब्दुल बशीर माजीद , जानी सय्यद , चंद्रकांत टेंगेटोल , दत्ता खंकरे आदी उपस्थित होते. यावेळी भा. ई. नगराळे पुढे बोलताना म्हणाले की , मुस्लिम समाजाला शिक्षण , नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण देण्याचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. सन २०१४ तत्कालीन राज्य सरकारने दिलेले आरक्षण उच्च व सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरवून मान्य केलेले आहे. परंतु राज्य सरकारने थांबविलेले आहे. ते मुस्लिम आरक्षण परत द्या ही मागणी मुस्लिम समाजाची आहे. एखादा समाज मागास असेल तर आरक्षण देण्याची कायद्यात तरतूद आहे.. ते तपासूनच सन २०१४ मध्ये राज्य शासनाने मुस्लिम समाजाला आरक्षण दिले आहे. राज्य शासनाने थांबवलेले आरक्षण मुस्लिम समाजाला परत द्यावे अशी मागणी नगराळे यांनी यावेळी मंत्री बनसोडे यांच्याकडे केली.
चौकट
फुले , शाहू , आंबेडकरांचा विचार सोडला नाही !
- क्रीडामंत्री संजय बनसोडे
: देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी आमचे नेते अजित पवार यांनी मार्ग बदलला असला तरी आम्ही फुले , शाहू , आंबेडकर यांचा विचार सोडलेला नाही. त्यांच्या विचारावरच आमचे काम सुरू असून पदे हे काम करण्यासाठी असतात असे राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.
उदगीर विधानसभा मतदार संघातील मुस्लिम समाजाने आपल्याला आमदार करण्यासाठी भरभरून साथ दिलेली आहे. तर आपण सुद्धा मुस्लिम समाजाला साथ दिली आहे , देत आहे , देणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. राज्याच्या अल्पसंख्यांक विभागाकडून व शासनाच्या वतीने मुस्लिम समाजाच्या मूलभूत गरजा , त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू असून शासनाकडून मोठा निधी उपलब्ध करून देत आहोत. आपल्याला विधानसभेत पाठविण्यासाठी प्रत्येक समाजातील घटकांनी प्रयत्न केले आहेत याची आपणास जाणीव आहे. मी इकडं – तिकडं गेलो असे समजून काळजी करू नका… ही पदे काम करण्यासाठी असतात , लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही फिरत असतो. भा. ई. नगराळे हे मागच्या सहा महिन्यांपासून सर्वत